अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी इमर्जन्सी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. गेले अनेक महिने ती या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच ती यात माझे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसेल. अभिनेत्री म्हणून नुकतंच तिने या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केलं. यानिमित्त तिने एक खास पोस्ट लिहित या चित्रपटाच्या निर्मितीबाबतचे काही मोठे खुलासे केले आहेत.

कंगना गेले अनेक दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच ती निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळत आहे. या चित्रपटाची निर्मिती करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी तिला स्वतःची मालमत्ता ही गहाण ठेवावी लागल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने अभिनेत्याच्या जन्मदिनानिमित्त दाखवले त्याचे कधीही न पाहिलेले फोटो, म्हणाली…

कंगनाने नुकतेच सोशल मीडियावर चित्रपटाचे काही बिहाइंड द सीन्स फोटो पोस्ट केले. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “अभिनेत्री म्हणून आज मी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. माझ्या आयुष्यातला एक गौरवशाली टप्पा पूर्ण होत आला आहे. दिसताना असं दिसतं की माझा हा प्रवास आरामदायी होता पण सत्य यापेक्षा बरंच वेगळं आहे. माझ्या मालकीची सर्व मालमत्ता गहाण ठेवण्यापासून ते चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या शेड्युलच्या वेळी डेंग्यूचे निदान होईपर्यंत, शरीरात रक्तपेशींची संख्या कमी असतानाही शूटिंग करेपर्यंत अनेक परीक्षांना मला सामोरं जावं लागलं.”

हेही वाचा : “‘इमर्जन्सी’ चित्रपटाचं शूटिंग संसदेत होणार नाही कारण…” कंगना रणौतने चर्चांना दिला पूर्णविराम

पुढे ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर माझ्या भावना अगदी मोकळेपणाने मांडते, परंतु या गोष्टी मी कधीही शेअर केला नाहीत. जे माझी अनावश्यक काळजी करतात, ज्यांना मला अपयशी होताना पाहायचं आहे आणि जे मला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना मला माझ्या दुःखाचा आनंद द्यायचा नव्हता. त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगायचं आहे की, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमच कामी येतात असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. तुम्ही कठोर परिश्रम घेतलेच पाहिजेत पण तुमच्या क्षमतेबाहेर जर तुमची परीक्षा पाहण्यात येत असेल तर तुम्ही खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. जर तुम्ही खचलात तर तेही सेलिब्रेट करा. कारण तो कालावधी तुमच्या पुनर्जन्माचा कालावधी असतो. हा माझ्यासाठी एक पुनर्जन्मच होता. हे माझ्यासाठी घडवून आणल्याबद्दल माझ्या अत्यंत प्रतिभावान टीमचे मनःपूर्वक आभार.”आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.