scorecardresearch

आईच्या साधेपणाबद्दल भाष्य करणारी कंगना रणौतची खास पोस्ट; फिल्म माफियालाही सुनावले खडेबोल

कंगनाने ट्विटरवर तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची आई शेतात काम करत आहे

kangana ranaut with mother
फोटो : सोशल मीडिया / ट्विटर अकाऊंट कंगना रणौत

कंगना रणौत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. ती कधी वादग्रस्त विधाने तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करत असते. बऱ्याचदा कंगना देशात सुरू असलेल्या समस्यांबद्दल भाष्य करते परंतु कधीकधी अभिनेत्री चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्यातील काही अपडेट देत असते. नुकतंच कंगनाने तिच्या आईविषयी एक खास पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे.

कंगनाने ट्विटरवर तिच्या आईचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची आई शेतात काम करताना दिसत आहे. फोटोमध्ये कंगनाची आई आशा ह्या शेती करताना दिसत आहेत. कंगनाने फोटोबरोबरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही माझी आई आहे, जी रोज सात-आठ तास शेती करते. अनेकदा लोक घरी येतात आणि म्हणतात आम्हाला कंगनाच्या आईला भेटायचं आहे, त्यांचा ती उत्तम पाहूणचार करते. ती अतिशय विनम्रपणे हात धुते आणि त्यांना चहा आणि पाणी देते आणि म्हणते की मी तिची आई आहे. तिला पाहून लोक बऱ्याचदा आश्चर्यचकित होतात.”

आणखी वाचा : आधी चित्रपट फ्लॉप, आता कॉन्सर्टही रद्द; अक्षय कुमारच्या मागे लागलेलं शुक्लकाष्ठ कायम

कंगनाच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तिच्या आईचं कौतूक केलं तर काहींनी तिला नेहमीप्रमाणेच ट्रोल केलं. “कंगना एवढी श्रीमंत असूनही आज तिची आई शेतात काम करते, कुठून येतो एवढा साधेपणा?” असा प्रश्न एका ट्विटर युझरनी विचारला. त्यावर कंगना उत्तर देत म्हणाली, “माझ्यामुळे माझी आई श्रीमंत नाही, माझ्या कुटुंब राजकारण, सरकारी नोकरी आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रात कार्यरत आहे. माझ्या आईने गेली २५ वर्षं शिक्षिका म्हणून काम केलं आहे. त्यामुळे माझे विचार कुठून येतात, किंवा मी पैशांसाठी लग्नात जाऊन का नाचत नाही याचा अंदाज फिल्म माफियाला आला असेल.”

kangana post 1
कंगना रणौत पोस्ट 2
kangana post 2
कंगना रणौत पोस्ट 2

शिवाय लग्नात नाचणाऱ्या सेलिब्रिटीजचा ‘भिकारी फिल्म माफिया’ असा उल्लेख करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “फेकलेल्या पैशांवर लग्नात नाचणं आणि आयटम डान्स करणाऱ्यांना या साधेपणाची किंमत कळणार नाही. यामुळेच या लोकांबद्दल माझ्या मनात कधीच आदर नसतो, मी कधीच यांचा आदर करू शकत नाही.” या शब्दात कंगनाने तिला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. कंगना आता ‘इमर्जन्सि’ या चित्रपटात झळकणार आहे, या चित्रपटाचं दिग्दर्शनही कंगनाने केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 14:06 IST
ताज्या बातम्या