Emergency Trailer : बॉलीवूडच्या बहुचर्चित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘इमर्जन्सी’. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची दोन वेळा तारीख बदलण्यात आली आणि अखेर काही दिवसांपूर्वी निश्चित प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. सत्य घटनेवर आधारित असलेला कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात २१ महिने देशात लागू केलेला आणीबाणी काळ पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांनी सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. “इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया. देशातच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला आणि तिने इतिहासात लिहिलेला सर्वात काळा अध्याय”, असं कॅप्शन लिहित कंगना यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

When Rajesh Khanna rejected Bigg Boss offer
दिवंगत राजेश खन्नांना दिलेली ‘बिग बॉस’ची ऑफर, निर्माते एका एपिसोडसाठी देणार होते तब्बल ३.५ कोटी, पण…
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sam Manekshaw Daughter message to Vicky Kaushal
“५ महिन्यांपूर्वी बाबा होतास, आता कोण झालास!” विकी कौशलला सॅम मानेकशॉ यांच्या मुलीने केला मेसेज; अभिनेता म्हणाला…
Munawar Faruqui
Munawar Faruqui : “हे कोकणी लोक कायम…”, मुनव्वर फारुकीकडून मराठी माणसाबाबत अपशब्द; मनसे आक्रमक
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”
Amitabh Bachchan
“एक दिवस असा येईल…”, राजेश खन्नांनी अमिताभ बच्चन यांचा अपमान केल्यावर जया बच्चन यांनी केलेलं भाकीत
Manu Bhaker says Neeraj is my senior player
Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!

हेही वाचा – “जान्हवी खूप भोळी आहे”, ‘बिग बॉस’मधील मैत्रिणीबद्दल मराठी अभिनेत्याचं वक्तव्य, म्हणाला, “ती मॉडर्न दिसते पण…”

Kangana Ranaut
Kangana Ranaut Post

“सत्ता म्हणजे धकधक”, अशी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात होत आहे. २५ जून १९७५ साली देशात इंदिरा गांधींच्या नेतृत्वात कशाप्रकारे आणीबाणी लागू करण्यात आली? विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात कशाप्रकारे टाकण्यात आलं? असं सर्वकाही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. “नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे इस देश से”, “राजनीति में कोई सगा नही होता”, “मैं हूं कॅबिनेट”, “इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया” अशा ट्रेलरमधील काही डायलॉग चर्चेत आले आहेत. इंदिरा गांधींच्या भूमिकेत कंगना रणौत झळकल्या असून त्यांच्या हुबेहूब लूक व आवाजाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: सूर्यवंशी कुटुंबाची खरी लक्ष्मी करणार गृहप्रवेश, पण दुसऱ्याबाजूला घडणार ‘ही’ धक्कादायक घटना

‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना रणौत ( Kangana Ranaut ) यांच्यासह अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ‘इमर्जन्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ

दरम्यान, याआधी ‘इमर्जन्सी’ चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार होता. पण लोकसभा निवडणुकीत कंगना रणौत यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा निवडणुकीचं तिकिट त्यांना मिळालं. त्यामुळे यावेळी कंगना प्रचारात आणि मतदारसंघातील कामात व्यग्र होत्या. या कारणामुळे ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ६ सप्टेंबर निश्चित करण्यात आली.