scorecardresearch

Premium

Tejas Teaser : “भारत को छेडोगे तो…” कंगना रणौतच्या बहुचर्चित ‘तेजस’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

या टीझरसह कंगनाने याचं नवीन पोस्टर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘एयर फोर्स डे’च्या मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे

kangana-ranaut-tejas-teaser
फोटो : व्हिडीओतून स्क्रीनशॉट

कंगना रणौत ही बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे जी सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. चित्रपट असो किंवा राजकीय मत कंगना अगदी स्पष्टपणे सगळीकडे व्यक्त होते. इतकंच नव्हे तर सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तिचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा टीझर शेयर केला आहे.

कंगनाचा हा चित्रपट भारतीय हवाई दलाची पायलट तेजस गिल यांच्या जीवनावर बेतलेला आहे. खरंतर या चित्रपटाची चर्चा दोन वर्षांपासून सुरू होती, २०२२ मध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणं अपेक्षित होतं परंतु काही कारणास्तव हा चित्रपट लांबणीवर पडत गेला.

tejas-trailer
Tejas Trailer: “ये वो भारत है…” कंगना रणौतच्या ‘तेजस’चा ट्रेलर प्रदर्शित; दमदार भूमिकेत दिसणार बॉलिवूडची ‘क्वीन’
ankush official trailer
Video : अ‍ॅक्शनचा तडका, केतकी माटेगावकरचा बोल्ड लूक अन्…; ‘अंकुश’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
the-vaccine-wae-trailer
The vaccine War Trailer : “India Cant Do It…” विवेक अग्निहोत्रींच्या बहुचर्चित ‘द व्हॅक्सीन वॉर’चा ट्रेलर प्रदर्शित
oppenheimer-ott-release
नेटफ्लिक्स की अ‍ॅमेझॉन प्राइम; कधी व कशावर पाहता येणार ख्रिस्तोफर नोलनचा ‘ओपनहायमर’?

आणखी वाचा : कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत

प्रथम हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर अचानक याच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेतले गेले. चित्रपटाचं व्हीएफएक्सचं बरंच काम बाकी असल्याने हे प्रदर्शन लांबणीवर ढकललं गेलं.

परंतु अखेर या चित्रपटाचा पहिला टीझर लोकांसमोर आला आहे. यात कंगना हवाई दलाच्या युनिफॉर्ममध्ये तेजस गिल यांच्या भूमिकेत एका जबरदस्त अंदाजात बघायला मिळत आहे. याबरोबरच अंगावर रोमांच आणणारा एक संवादही आपल्याला ऐकायला मिळत आहे. टीझरमधून फक्त कंगनाचा डॅशिंग अवतारच आपल्याला पाहायला मिळाला आहे, बाकी चित्रपटाच्या कथेबद्दल काहीच कल्पना देण्यात आलेली नाही.

या टीझरसह कंगनाने याचं नवीन पोस्टर आणि ट्रेलरची रिलीज डेटही जाहीर केली आहे. ‘एयर फोर्स डे’च्या मुहूर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. तर ‘तेजस’ २७ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच कंगनाची मुख्य भूमिक असलेला व तिनेच दिग्दर्शित केलेल्या ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. नुकताच कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे ज्याला ठीक ठाक प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kangana ranaut starrer tejas movie teaser out now film is based on air force pilot tejas gill avn

First published on: 02-10-2023 at 11:42 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×