गीतकार जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. राजकीय आणि सामाजिक विषयांवर नेहमीच ते व्यक्त होतात आणि आपली मतं मांडत असतात. आताही त्यांनी पाकिस्तानबद्दल जे वक्तव्य केलं आहे त्याची चर्चा देशभरात होताना दिसत आहे. जावेद अख्तर यांच्या या वक्तव्यावर आता अभिनेत्री कंगना रणौतनेही प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर बरंच चर्चेत आहे.

कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्या कार्यक्रमातील व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. याच बरोबर तिने लिहिलं, “जेव्हा मी जावेद साहेबांच्या कविता ऐकते तेव्हा असं वाटतं की कशी सरस्वती मातेने यांच्यावर एवढी कृपा केली आहे. पण पाहा काहीतरी प्रामाणिकपणा असतोच माणसात. जय हिंद जावेद अख्तर साहेब. घरात घुसून मारलात. हाहाहा”

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

आणखी वाचा- “ते तुमच्या देशात…” जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन २६/११च्या मुंबई हल्ल्याबद्दल व्यक्त केली मनातील खदखद

सोशल मीडियावर काही लोक कंगनाच्या या ट्वीटचं कौतुक करताना दिसत आहेत. तर काहीजण तिला ट्रोलही करत आहे. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “सत्य सांगण्याची हिंमत आहे मुस्लिमांमध्ये, ते कसेही असले तरीही तुझ्यासारखे दोन्ही बाजूंनी बोलणारे नाहीत.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “१०० चूहे खाकर बिल्ली हज को चली हे वाक्य कंगनासाठी एकदम परफेक्ट आहे.” याशिवाय आणखी एकाने लिहिलं, “तू आजकाल डाव्या विचारसारणीच्या लोकांना जास्त सपोर्ट करत आहेस, तर तुला आम्ही काय समजावं.”

आणखी वाचा- मलायका-अर्जुन नात्याला देणार नवीन ओळख? साखरपुड्याबद्दलचं ‘ते’ ट्वीट चर्चेत

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानच्या ‘फैज फेस्टिवल २०२३’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी २६/११च्या गुन्हेगारांचा मुद्दा अधोरेखित केला. त्यांनी या कार्यक्रमात शायराना अंदाजात पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल टोला लगावला. ते म्हणाले, “आपण एकमेकांना दोष देणं थांबवलं पाहिजे, त्यामुळे कोणतीही समस्या सुटणार नाही. एकूणच सध्या जे वातावरण तापलं आहे ते कमी व्हायला पाहिजे. आम्ही मुंबईकर आहोत, आम्ही पाहिलं आहे तेव्हा मुंबईवर कशापद्धतीने हल्ला झाला होता. ती लोकं नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ही लोक अजूनही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत आणि ही खदखद एखाद्या भारतीयाच्या मनात असेल तर त्याचं तुम्ही वाईट वाटून घ्यायला नको.”