बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार होता. मात्र याच दिवशी अमिताभ बच्चन, टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन यांच्या भूमिका असलेला ‘गणपत’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिने तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. यामुळे कंगनाने एक पाऊल मागे घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आता कंगनाने या प्रकरणी भाष्य करत ‘गणपत’च्या निर्मात्यांवर सडेतोड टीका केली आहे.

कंगना रणौतने नुकतंच ट्विटरवर सलग तीन ट्वीट केले आहेत. या ट्वीटद्वारे तिने अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी कंगना म्हणाली, “मी जेव्हा माझा आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी तारीख शोधत होते, तेव्हा मला जाणवले की यंदा अनेक तारखा उपलब्ध आहेत. कदाचित हिंदी चित्रपटसृष्टी अडचणीत असल्यामुळे. पण मी माझ्या पोस्ट प्रॉडक्शनचा विचार करुन २० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली.”
आणखी वाचा : कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वत:ची तुलना, म्हणाली “मी देखील कधीही…”

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
What Kangana Said?
अभिनेत्री कंगना रणौतचं महत्त्वाचं वक्तव्य, “मी गोमांस…”

“त्यानंतर आता आठवड्याभरातच टी सीरिजचे सर्वेसर्वा भूषण कुमार यांनीही २० ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. संपूर्ण ऑक्टोबर महिना तसा रिकामी आहे. फक्त ऑक्टोबरच नव्हे तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि अगदी सप्टेंबर महिनाही रिकामी आहे. पण तरीही अमिताभ बच्चन आणि टायगर श्रॉफ यांनी त्यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी २० ऑक्टोबर हीच तारीख निवडली.”

मला वाटतंय की बॉलिवूडच्या माफिया टोळीमध्ये महत्त्वाची बैठक झाली असावी. पण आता मात्र मी ‘इमर्जन्सी’चा ट्रेलर आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख महिनाभर आधीच जाहीर करेन. जर संपूर्ण वर्ष हे रिकामे असेल तर मग विनाकारण एकाच दिवशी चित्रपट प्रदर्शित का करायचेत? ही सिनेसृष्टीची वाईट अवस्था आहे. तरीही लोक इतका मुर्खपणा करतात. तुम्ही सगळे काय खाता जेणेकरुन तुम्ही इतके आत्मघाती असल्यासारखे वागता?” असे ट्वीट करत कंगनाने सडेतोड टीका केली आहे.

आणखी वाचा : “मला माझे ट्विटर अकाऊंट परत मिळाले तर…” कंगना रणौतचे स्पष्ट वक्तव्य

दरम्यान कंगना रणौतने २०२१ मध्ये ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात कंगना रणौत ही पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याबरोबर ती या चित्रपटाचे दिग्दर्शनही करत आहेत. कंगनाशिवाय या चित्रपटात अनुपम खेर, मिलिंद सोमण, महिमा चौधरी आणि श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत.

तर दुसरीकडे ‘गणपत’ या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट विकास बहल यांनी दिग्दर्शित केला आहे.