scorecardresearch

“सिनेसृष्टीत क्वचितच…” सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतची खास पोस्ट

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.

kangana sid kiara

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडयावर सातत्याने चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही काळापासून होताना दिसत होत्या. आता अखेर ६ फेब्रुवारी रोजी ते लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या बातमीने फक्त त्यांचे चाहतेच नाही तर बॉलिवूड कलाकारही आनंदी झाले आहेत. आता अभिनेत्री कंगना रणौतने या दोघांसाठी एक खास संदेश लिहित त्यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. ५ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आता अशातच कंगनाने सिद्धार्थ आणि कियारासाठी खास स्टोरी शेअर केली आहे.

आणखी वाचा : ‘इमर्जन्सी’ चित्रपट बनवण्यासाठी कंगना रणौतने गहाण ठेवली तिची संपूर्ण मालमत्ता, म्हणाली, “माझ्या मालकीची…”

सिद्धार्थ आणि कियारा यांचा एक छोटासा व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत कंगनाने लिहिलं, “हे जोडपं किती आनंददायी आहे. सिनेसृष्टीत असं खरं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं. ही दोघं एकत्र खूप छान दिसतात.” आता तिच्या या स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती’, अभिनेत्री कियारा आडवाणी झाली ट्रोल

दरम्यान नुकतच अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय या शाही विवाह सोहळ्यासाठी जैसलमेरला रवाना झाली आहेत. नुकतेच कियाराचे एअरपोर्टवरील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील. त्यामुळे आता यांचा लग्न सोहळा कसा रंगतोय हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 11:25 IST