This Bollywood Singer Remarried At 43 : बॉलीवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी व्यक्ती आहेत, ज्या त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे लोकप्रिय गायिका कनिका कपूर. कनिका तिच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असते.

गायिका कनिका कपूर ‘बेबी डॉल’, ‘लवली’ व ‘चिट्टियां कलाइयां’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखली जाते. बऱ्याचदा कलाकार पडद्यावर किंवा प्रेक्षकांसमोर हसताना दिसतात; परंतु ते त्यांच्या खासगी आयुष्यात कठीण परिस्थितीचा सामना करत असतात. असंच काहीसं कनिकाबरोबरही झालं.

व्यावसायिक आयुष्यात तिला यश मिळालं असलं तरी खासगी आयुष्यात मात्र तिला बऱ्याच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागल्याचं म्हटलं जातं. ‘एबीपी’च्या वृत्तानुसार कनिका कपूरचं पहिलं लग्न १९८८ मध्ये ती १८ वर्षांची असताना झालेलं. परंतु, पुढे २०१२ मध्ये ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. कनिकाला तीन मुलं आहेत, ज्यांची नावं आयना, समारा व युवराज. अशी आहेत.

उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर कनिकानं दुसरं लग्न केलं. २०२२ मध्ये तिनं उद्योजक गौतम हाथीरमानी यांच्यासह दुसरं लग्न करत दुसऱ्यांदा संसार थाटला. त्यावेळी अनेकांनी तिला यासाठी ट्रोलही केलं; परंतु, कनिकानं त्याकडे दुर्लक्ष केलं. कनिका व गौतम यांनी तेव्हा युके येथे जवळच्या लोकांच्या साक्षीनं लग्न केलं आणि लंडनमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलेलं, ज्याला लोकप्रिय सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

इ-टाइम्सशी संवाद साधताना कनिकानं सांगितलेलं की, गौतम व ती १५ वर्षं मैत्रीच्या नात्यात होते. मग एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत असल्यानं त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कनिकाच्या पतीनं गौतम यांनी २०१४ साली तिला लग्नाची मागणी घातलेली; परंतु त्यावेळी तिला ते मस्करी करत आहेत, असं वाटल्यानं तिनं त्यांना नकार दिला. त्यानंतर पुन्हा २०२० मध्ये त्यांनी लग्नासाठी विचारल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी लग्न केलं.