scorecardresearch

कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ या राज्याने केला टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने ट्वीट करत दिली खुशखबर

हळूहळू या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पकड घेतली

zwigato tax free
फोटो : इंडियन एक्सप्रेस

कॉमेडियन कपिल शर्मा हा त्याच्या विनोदी शैलीसाठी खूप लोकप्रिय आहे. ‘द कपिल शर्मा शो’ने त्याला वेगळी ओळख दिली. तर आता नुकताच तो ‘झ्विगाटो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही दाखवण्यात आला. पहिल्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यास अयशस्वी ठरला मात्र नंतर हळूहळू याने बॉक्स ऑफिसवर पकड घेतली.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या पोस्टनुसार या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त ४३ लाख कमावले होते. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल या चित्रपटाच्या कमाईत ४४.०९ टक्क्यांनी वाढ झाली. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ६२ लाखांचा गल्ला जमवला होता. अशाचप्रकार चित्रपटाला प्रतिसाद वाढत आहे. आता या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे.

आणखी वाचा : “एक दिवस ते कपडे…” अदनान सामीने वजन वाढल्यानंतर केला होता ‘हा’ दृढनिश्चय

कपिल शर्मा आणि नंदिता दासचा हा चित्रपट ओडिशा सरकारने टॅक्स फ्री म्हणजेच करमुक्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. इतकंच नव्हे तर या राज्यात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकांनी पुढे यावं ज्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये मदत होईल अशी आशाही तिथल्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

‘फिराक’ आणि ‘मंटो’सारखे चित्रपट देणाऱ्या नंदिता दासने याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. या चित्रपटात कपिलने एका फूड डिलिव्हरी बॉयची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नंदिता दासने केलं असून कपिल शर्माच्याबरोबरीने गुल पनाग, सयानी गुप्ता हे कलाकारदेखील आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या