बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा बराच चर्चेत असतो. गेली काही वर्षं करणने दिग्दर्शनातून ब्रेक घेतला आहे. नुकत्याच यश चोप्रा यांच्यावर बेतलेल्या माहितीपटात करणने मुलाखत दिली होती. यादरम्यान त्याने आदित्य चोप्राबद्दलही बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता. आता अनुपमा चोप्राबरोबर केलेल्या नवीन पॉडकास्टमध्ये करणने आदित्य चोप्राबरोबर झालेल्या एका भांडणाचा किस्सा सांगितला आहे.

२००६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या दरम्यान करण आणि आदित्य चोप्रामध्ये वाद झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहरने केलं होतं. या चित्रपटात शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांच्यातील एका इंटीमेट सीनवरुन करण आणि आदित्यमध्ये मतभेद निर्माण झाले होते. आदित्य चोप्राला तो सीन चित्रपटात नको होता आणि याबद्दल त्याने नाराजीदेखील व्यक्त केली होती.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे
ilayaraja-biopic
धनुषच्या आगामी ‘इलयाराजा’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “एक स्वप्न…”

आणखी वाचा : सुप्रसिद्ध गायक बेनी दयालला लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दुखापत; ड्रोन कॅमेरा ठरला अपघाताचं निमित्त

याबद्दल करण म्हणाला, “आम्ही तो सीन शूट करत होतो. तेव्हा मला आदित्यचा फोन आला आणि तो मला म्हणाला की त्याला वाटतं की या दोन पात्रांनी आत्ता सेक्स करणं योग्य नाही. भारतीय प्रेक्षक ही गोष्ट स्वीकारणार नाहीत. त्यांनी तिथून मागे वळणंच योग्य ठरेल. मी मात्र माझ्या मतावर ठाम होतो. एखादं जोडपं रिलेशनशीपमध्ये आहे आणि त्यांच्यात शारीरिक संबंध नाहीत ही गोष्ट मला न पटणारी होती. त्यामुळे तेव्हा आमचा फोनवर प्रचंड वाद झाला. नंतर जेव्हा मी तो चित्रपट शांतपणे बसून पाहिला तेव्हा मला आदित्यचं म्हणणं पटलं.”

करण जोहरचा ‘कभी अलविदा ना केहना’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधावर बेतलेला होता. यात शाहरुख खान, प्रीती झिंटा, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, किरण खेरसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. करणला जेवढी अपेक्षा होती तेवढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. आता करण जोहर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून पुन्हा दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे.