Koffee With Karan Salman Khan Promo : सलमान खान सध्या करण जोहरच्या कॉफी विथ करण शोमुळे चर्चेत आहे. या शोच्या शेवटच्या सीझनचा पहिला पाहुणा सलमान खान आहे. कॉफी विथ करणचा पहिला प्रोमो आला आणि त्यात करणने सलमान खानला विचारलेला प्रश्न चांगलाच व्हायरल झाला. करणने ६० वर्षांच्या सलमानला थेट ‘तू व्हर्जिन आहेस का?’ असं विचारलं. त्यावर भाईजानने काय प्रतिक्रिया दिली, ते पाहुयात.

प्रोमोमध्ये करण जोहर सलमानचं स्वागत करत म्हणाला, ‘एका समजूतदार व्यक्तीने कधीतरी म्हटलं होतं – इट्स डन ब्रो. त्यामुळे, माझ्या शेवटच्या सीझनची सुरुवात करण्यासाठी त्या व्यक्तीपेक्षा उत्तम कोण असू शकतं, जी खुद्द सलमान खान आहे?’ यानंतर सलमान म्हणाला, ‘कॉफी विथ करणनंतर कॉफी विथ सलमान.’ दरम्यान, गप्पा मारत असताना करणने अचानक सलमानला विचारलं, ‘तू अजूनही व्हर्जिन आहेस का?’ यावर सलमान म्हणाला, ‘कंट्रोल यार, भाई. कंट्रोल. हे मागच्या सीझनसारखं नाहीये.”

प्रोमोमध्ये करणने सलमानच्या बदललेल्या स्वभावाबद्दलही प्रश्न विचारला आणि म्हणाला, ‘तू खूप वेगळा वाटतोय. खूप शांत झाला आहेस.’ त्यावर सलमानने ‘मी इतरांना जे सल्ले देतोय, त्याचे स्वतः पालन करण्याची वेळ आता आली आहे.’

पाहा कॉफी विथ करणचा प्रोमो

करण जोहरने पूर्वीही सलमान खानला विचारलेला हाच प्रश्न

करणने सलमान खानला व्हर्जिनिटीबद्दल विचारण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जेव्हा सलमान या शोमध्ये आला होता, तेव्हाही करणने त्याला ‘तू व्हर्जिन आहेस का?’ हाच प्रश्न विचारला होता आणि त्यावर सलमानने उत्तरही दिलं होतं.

२०१३ मध्ये सलमानने करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी करणने ‘तू व्हर्जिन आहेस का?’ असं विचारल्यावर सलमानने होकार दिला होता. चाहत्यांना हे उत्तर खरं वाटत होतं. त्यावर करणने प्रतिक्रिया दिली होती. करण जोहरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, “सलमान जेव्हा त्याच्या व्हर्जिनिटीवर बोलत होता तेव्हा तो विनोद करत होता. सलमानची विनोदबुद्धी अप्रतिम आहे. लोकांनी हे सत्य म्हणून स्वीकारले आहे यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्ही काहीही बोललात तरी ते त्यावर विश्वास ठेवतात हे विचित्र आहे.”

कॉफी विथ करणच्या १०० व्या एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली होती. त्यावेळी सलमान त्याचा भाऊ अरबाज आणि सोहेल खानबरोबर आला होता. त्यावेळी पुन्हा एकदा करणने सलमानला ‘मग, तू अजूनही व्हर्जिन आहेस का?’ असं विचारलेलं. यावर उत्तर देत सलमानने, “हो, आतापर्यंत काहीही बदललेलं नाही,” असं उत्तर दिलं होतं.