बॉलिवूडमधील आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक म्हणून करण जोहरचं नाव घेतलं जातं. करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या फॅशन आणि त्याच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतो. पण आता एका वेगळाच कारणाने सर्वांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचा विमानतळावरील व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ. करण जोहर सध्या त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यग्र आहे. मुंबई बाहेर विविध ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केलं जात आहे. तर करण नुकताच मुंबई विमानतळावर दिसला. कामानिमित्त दुसऱ्या शहरात जात होता. पण विमानतळाच्या आत जाताना सिक्युरिटी चेकिंग केल्याशिवाय तो आत चालला होता. त्यामुळे त्याला सुरक्षारक्षकाने करणच्या सहकाऱ्यांना सांगून त्याला थांबवत त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. आणखी वाचा : “भाज्या, प्रोटीन शेक अन्…” उत्तम शरीरयष्टीमागे रणबीर कपूरची मोठी मेहनत, केला ‘या’ पदार्थांचा त्याग व्हायरल होत असलेला व्हिडीओमध्ये करण जोहर त्याच्या अंदाजात विमानतळावर एंट्री करताना दिसला. विमान पकडण्यासाठी जात असताना करण त्याच्याच धुंदीत आतमध्ये प्रवेश करताना दिसला. तो त्याच्या विचारांमध्ये इतका मग्न होता की बाहेर तो त्याची कागदपत्र सुरक्षारक्षकाला दाखवायला विसरला. करण तसाच आत जात असल्याने सुरक्षारक्षकाने त्याला अडवलं आणि त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली. मग करणनेही तिथे थांबून त्याचे कागदपत्र सुरक्षारक्षकाला दाखवली आणि नंतर तो आत गेला. हेही वाचा : “…पण त्याला थोडं कमी लेखलं गेलं,” करण जोहरने रितेश देशमुखसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत परंतु करणचं हे वागणं नेटकऱ्यांना चांगलंच खटकलं. आता या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी त्याच्यावर टीका करू लागले आहेत. अनेकांनी त्याला गर्विष्ठ म्हटलं. तर त्याचबरोबर अनेकांनी हे बॉलिवूडवाले स्वतःला फारच महान समजतात," अशा शब्दांमध्ये करणच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला.