scorecardresearch

धर्मा प्रोडक्शनच्या ३ चित्रपटांमध्ये दिसणार सिद्धार्थ-कियारा? खुलासा करत करण जोहर म्हणाला, “मी त्यांना…”

करण जोहर सिद्धार्थ-कियाराला गेली अनेक वर्ष ओळखतो. त्यामुळे सिद्धार्थ कियाराचं आणि करणचं खूप छान बॉन्डिंग आहे.

karan

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अखेर ७ फेब्रुवारी रोजी ही दोघं विवाहबद्ध झाली आहेत. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर संपन्न झाला. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहर देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होता. लग्नाचं गिफ्ट म्हणून करणने या नवविवाहित दांपत्याला तीन चित्रपटांसाठी साईन केलं आहे असं बोललं जात होतं. पण आता करणनेच या मागचं सत्य सांगितलं आहे.

सिद्धार्थ-कियारा यांचं लग्न होताच करणने त्या दोघांसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. यात त्याने त्याला सिद्धार्थ कियाराबद्दल वाटणारं प्रेम व्यक्त केलं होतं. फक्त पोस्टच नाही तर करणने त्या दोघांना त्याच्या तीन आगामी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेसाठी निवडलं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यातील एक चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करतील आणि हा चित्रपट ‘बद्री की दुल्हनिया’ या फ्रेंचायझीमधील असेल असं बोलण्यात येत होतं. आता अखेर करणनेच त्यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : रिसेप्शन सिद्धार्थ-कियाराचं पण चर्चा आकाश व श्लोका अंबानीच्या नम्रपणाची, व्हायरल व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘इ टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत त्याला विचारलं गेलं असता तो म्हणाला, “हे सगळं खोटं आहे. सिद्धार्थ-कियाराला मी कोणत्याही चित्रपटासाठी अजून साईन केलेलं नाही.” तर धर्मा प्रोडक्शनच्या एका जवळच्या सूत्राने ‘इ टाइम्स’ला सांगितलं की, धर्मा प्रोडक्शन्सने सिद्धार्थ-कियाराशी कुठलंही कॉन्ट्रॅक्ट केलेलं नाही. मुळात करणलाच सिद्धार्थ-कियाराला कोणत्याही करारामध्ये अडकवायचं नाहीये. त्याचप्रमाणे लग्नापूर्वी देखील सिद्धार्थ-कियाराने करण जोहरशी पैशासंदर्भात कोणताही व्यवहार केलेला नाही. त्यामुळे धर्मा प्रोडक्शनच्या आगामी चित्रपटांमध्ये सिद्धार्थ-कियारा दिसणार ही फक्त अफवा आहे.

हेही वाचा : लग्नानंतर लगेचच सिद्धार्थ-कियाराने खरेदी केलं त्यांचं ड्रीम होम, किंमत वाचून व्हाल थक्क

करण जोहर सिद्धार्थ-कियाराला गेली अनेक वर्ष ओळखतो. करणच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. चित्रपटाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. तर कियारा अडवाणीने करण जोहरच्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटात काम केलं होतं. त्यामुळे सिद्धार्थ कियाराचं आणि करणचं खूप छान बॉन्डिंग आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 16:37 IST