Karan Johar Praises War 2 Teaser: हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘वॉर २’ च्या टीझरचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्युनिअर एनटीआर व हृतिक रोशनच्या लूकचेदेखील मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. याबरोबरच, ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक रोशन समोरासमोर उभे असणार आहेत, हे टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
हृतिक रोशनच्या ‘वॉर २’चा टीझर पाहताच करण जोहर म्हणाला…
आता दिग्दर्शक व निर्माता करण जोहरनेदेखील या ‘वॉर २’ च्या टीझरचे कौतुक केले आहे. तसेच, हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचेदेखील त्याने म्हटले आहे. करण जोहरने सोशल मीडियावर टीझर शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. करण जोहर म्हणाला की या वर्षातील हा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. मी हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहू शकत नाही, अशा शब्दात त्याने त्याची उत्सुकता व्यक्त केली.

अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील हटके अंदाजात पाहायला मिळत आहे. ती बोल्ड अंदाजात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर कियाराच्या या लूकची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कियाराबरोबरच, हृतिक रोशनच्या लूकचेदेखील कौतुक होताना दिसत आहे. टीझरमधील हृतिक रोशनच्या लूकने प्रेक्षकांना भुरळ पडल्याचे कमेंट्समधून दिसत आहे. अनेकांनी हा टीझर उत्सुकता वाढविणारा असल्याचे म्हटले आहे.
१४ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘वॉर २’ हा बहुभाषिक सिनेमा असून हिंदी, तमीळ व तेलुगू या भाषांमध्ये तो जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘वॉर २’ हा चित्रपट वायआरएफ (YRF) स्पाय युनिव्हर्समधील सहावा सिनेमा आहे. याआधी प्रदर्शित झालेले ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’ व ‘टायगर ३’ हे सुपरहिट ठरले आहेत. आता ‘वॉर २’च्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. असाच प्रतिसाद चित्रपटाला मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.