Karan Johar Marriage Proposal Secrets: बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहर हा त्याच्या चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. करणनं लग्न केलं नसलं तरी त्याच्या रिलेशनशिपवर अनेकदा चर्चा होत असते. पण, करणला एका लोकप्रिय अभिनेत्री व फेमिना मिस इंडियानं प्रपोज केलं होतं. करण जोहरला या अभिनेत्री एक-दोन वेळा नाही, तर तब्बल तीन वेळा लग्नासाठी विचारलं होतं.

करण जोहर हा अनेक दशकं सुपरहिट सिनेमे देत असून, बॉलीवूडमधील कलाकार व कुटुंबाबरोबर त्याचं खास नात आहे. मात्र, एकदा त्याला चक्क एका अभिनेत्रीनं लग्नासाठी प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे तिनं वेळा करणसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. ही अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. ‘नो फिल्टर नेहा’ या पॉडकास्टमध्ये नेहानं स्वतः हा मजेशीर किस्सा सांगितला होता.

का दिला होता करण जोहरने नकार?

नेहा धुपिया म्हणाली, “मी करणला वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेळा गमतीनं लग्नासाठी प्रपोज केलं होतं. मात्र, करणनं प्रत्येक वेळी प्रपोजल नाकारलं. नकार देताना त्यानं मला वेगवेगळी कारणंही सांगितली होती. नकार देण्याचं कारणही नेहानं सांगितलं. ती म्हणाली, “करणनं माझं प्रपोजल नाकारण्याचं एक कारण सांगितलं होतं की, त्याला माझं शरीर आकर्षक वाटत नाही.”

करण आणि नेहा यांच्यातील मैत्री मात्र आजही कायम आहे. विशेष म्हणजे करण जोहर हा नेहाच्या वैयक्तिक आयुष्यातही महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांनी अनेकदा एकत्र कामसुद्धा केलं आहे. करण जोहरनं दिग्दर्शित केलेल्या ‘लस्ट स्टोरीज’मध्ये नेहा धुपियानं भूमिका साकारली होती. तसेच ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातील रिपोर्टरच्या भूमिकेसाठी तिनं व्हॉईस ओव्हर दिला होता.

वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर नेहानं १० मे २०१८ रोजी अभिनेता अंगद बेदीबरोबर लग्न केलं. त्या दोघांना मेहर आणि गुरिक ही दोन अपत्यं आहेत. विशेष म्हणजे नेहा आणि अभिनेता अंगद बेदी यांची ओळख करून देण्यामध्ये करण जोहरनं पुढाकार घेतला होता. ‘नो फिल्टर नेहा’च्या पॉडकास्टचा पहिला पाहुणाही करण जोहरचं होता आणि त्यानंतर तो या शोमध्ये अनेकदा सहभागी झाला आहे.

नेहा धुपियाच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून झाली. २००२ मध्ये तिनं फेमिना मिस इंडिया हा किताब जिंकला आणि त्यानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करीत टॉप १० मध्ये स्थान मिळवलं. पुढे ‘कयामत : सिटी अंडर थ्रेट’, ‘जुली’, ‘क्या कूल हैं हम’, ‘चुप चुप के’, ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘सिंह इज किंग’, ‘हिंदी मीडियम’ व ‘तुम्हारी सुलू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. अभिनयाबरोबर नेहा धुपियानं टेलिव्हिजन आणि पॉडकास्टिंगमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे.