बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक करण जोहर अनेकदा बॉलिवूड कलाकारांची पोलखोल करताना दिसतो. कधी स्वतःचा शो ‘कॉफी विथ करण’ तर कधी दुसऱ्या एखाद्या रिअलिटी शोमध्ये तो सेलिब्रेटींचे किस्से शेअर करताना दिसतो. आता करण जोहरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तो अभिनेत्री करीना कपूरशीसंबंधी एक किस्सा सांगताना दिसत आहे. इंडियन आयडॉल १३ च्या मंचावर करणने करीनाचा सेटवर ढसाढसा रडण्याचा किस्सा शेअर केला.

‘इंडियन आयडॉल १३’मध्ये होस्ट आदित्य नारायण करण जोहरला विचारतो, “तू एखाद्या अशा कलाकाराचं नाव सांगू शकतोस का ज्याने तुझ्या एखाद्या चित्रपटात किंवा एखाद्या सीनमध्ये ओव्हर अ‍ॅक्टिंग केली आहे?” या प्रश्नाचं उत्तर देताना करण जोहर अभिनेत्री करीना कपूरचं नाव घेतो. कशाप्रकारे करीनाने ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटाच्या सेटवर वेड्यासारखं रडून ओव्हर अ‍ॅक्टिंग करत सर्वांना हैराण केलं होतं. याचा किस्सा करणने सांगितला.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Shivam Dube Wife Anjum Khan Share Emotional Post for MS Dhoni on Instagram
IPL 2024: ‘सॉरी’ म्हणत शिवम दुबेच्या पत्नीची धोनीसाठी लांबलचक पोस्ट; अंजुम खान म्हणाली, “माझ्या तोंडून एकही शब्द..”
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब

आणखी वाचा-“सोशल मीडियामुळे कलाकारांचे स्टारडम…” करण जोहरचे वक्तव्य चर्चेत

करण म्हणाला, “आम्ही चित्रपटाचा शेवटचा सीन शूट करत होतो. जो शाहरुख खान आणि जया बच्चन यांच्या भेटीचा सीन होता. या सीनमध्ये करीना कपूर आणि काजोल यांनाही इमोशनल झालेलं दाखवायचं होतं. पण या दोघी संपूर्ण चित्रपटात एकमेकींची मस्करी करताना दिसल्या होत्या. त्या सीनच्या आधी करीना माझ्याकडे आली आणि म्हणाली मला आज इमोशनल सीन करायचा आहे तर रडावं लागेल का? तर मी म्हणालो, हो थोडसं इमोशनल व्हायचं आहे.”

करण पुढे म्हणाला, “सीनमध्ये शाहरुख-जया बच्चन एकमेकांना अनेक वर्षांनंतर भेटतात तेव्हा रडू लागतात आणि हे पाहिल्यानंतर हृतिक रोशनही भावूक होतो आणि तो मागे वळतो तेव्हा करीना त्याला आधार देणार असते. तिला हृतिकच्या खांद्यावर हात ठेवायचा असतो. पण जसं शूटिंग सुरू झालं तसं करीना जोरजोरात वेड्यासारखी रडू लागली. मी तिला पाहून हैराण झालो होतो आणि हृतिकलाही काही कळेना. पण ती तिच्या भूमिकेत होती. ती ढसाढसा रडत होती.”

आणखी वाचा-“तुझी बदनामी करण्यात आली पण…” करण जोहरने ‘पठाण’साठी केलेली पोस्ट चर्चेत

करणने सांगितलं, “करिनाची ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहून मी ओरडलो, ‘बेबो काय झालंय तुला?’ त्यावर ती मला म्हणाली, “तूच तर म्हणाला होतास की भावूक व्हायचं आहे.” तिचं बोलणं ऐकून मला हसू आलं मी तिला म्हणालो, “हो, पण ते भावूक होऊन असं रडायचं नव्हतं.” मी माझ्या पूर्ण करिअरमध्ये करीना कपूरची अशी ओव्हर अ‍ॅक्टिंग पाहिली आहे.”