scorecardresearch

करण जोहरचा बायोपिक येणार? ‘या’ अभिनेत्याने भूमिका साकारण्याची व्यक्त केली इच्छा

करण जोहरने त्याच्या बायोपिकबाबत एक इच्छा बोलून दाखवली. शिवाय यामध्ये कोणत्या अभिनेत्याने काम करावं हेही त्याने सांगितलं.

Karan Johar Ranveer Singh
करण जोहरने त्याच्या बायोपिकबाबत एक इच्छा बोलून दाखवली. शिवाय यामध्ये कोणत्या अभिनेत्याने काम करावं हेही त्याने सांगितलं.

दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने आजवर बॉलिवूडला उत्तमोत्तम चित्रपट दिले. वयाच्या २६व्या वर्षीच त्याने एव्हरग्रीन चित्रपट ‘कुछ कुछ होता है’चे दिग्दर्शन केलं. आलिया भट्ट, वरुण धवनसारख्या स्टार किड्सला चित्रपटसृष्टीमध्येही करणनेच लाँच केलं. चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यात तो यशस्वी ठरला. चित्रपटसृष्टीमध्ये बायोपिकची चलती असताना करणनेही एक इच्छा बोलून दाखवली आहे.

आणखी वाचा – Video : “प्रेमात पडले कोल्हापूरच्या, पाहून शाही थाट…” लाजत मुरडत पाठकबाईंचा राणादासाठी खास उखाणा

एका कार्यक्रमामध्ये करणने हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकाने करणला त्याच्या बायोपिकबाबत प्रश्न विचारला. “कोणता अभिनेता तुझ्या बायोपिकसाठी अगदी योग्य आहे?” असा प्रश्न करणला विचारण्यात आला.

यावेळी करणने लगेचच रणवीर सिंगचं नाव घेतलं. करण म्हणाला, “रणवीर सिंग माझ्या बायोपिकसाठी अगदी योग्य आहे. कारण तो नेहमी रंग बदलत असतो. म्हणूनच रणवीर मोठ्या पडद्यावर माझी भूमिका उत्तमरित्या निभावू शकतो.”

आणखी वाचा – Video : मंगलाष्टका झाल्या, खांद्यावर उचलून घेतलं अन् पाठकबाईंनी राणादाच्या गळ्यात हार घालत केलं किस; हार्दिक-अक्षयाच्या लग्नातील खास क्षण

करणच्या बालपणाची गोष्टही रुपेरी पडद्यावर दाखवण्यात यावी अशी त्याची इच्छा आहे. कारण त्याच्या म्हणण्यानुसार करणचं बालपण खूप सुंदर व मस्त होतं. माझ्या आई-वडिलांनी माझं संगोपन अगदी उत्तम केलं असं करणनचं म्हणणं आहे. आताही मागे वळून पाहताना करण स्वतःला नशिबवान समजतो. आता खरंच करणचा बायोपिक येणार का? हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 11:30 IST
ताज्या बातम्या