बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी लग्नबंधनात अडकले. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची गेले बरेच महीने चर्चा सुरू होती. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली.
“आता आमची कायमस्वरुपी बुकींग झाली आहे. आमच्या पुढील वाटचालीसाठी तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असू द्या”, असे कॅप्शन त्यांनी हे फोटो शेअर करताना दिले आहेत. या लग्नसोहळ्यात बऱ्याच सेलिब्रिटीजनी हजेरी लावली. २ दिवस आधीपासूनच करण जोहर, शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा कपूर यांचे एयरपोर्टवरचे फोटोज व्हायरल झाले. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला.
आणखी वाचा : जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या पॅन्टमध्ये शिरतो उंदीर; पोस्ट शेअर करत महानायकाने सांगितला किस्सा
कियारा आणि सिद्धार्थचे लग्नातील फोटोज पाहून नेटकऱ्यांनी करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाची आठवण काढली आहे. करणच्या तीनही विद्यार्थ्यांना त्यांचं प्रेम मिळालं असं काही लोकांचं म्हणणं आहे. या चित्रपटातून वरुण धवन, आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता या तिघांची लग्नं झाली आहेत.
आलिया भट्टने रणबीर कपूरबरोबर, वरूण धवनने नताशा दलालशी आणि आता सिद्धार्थने कियारासह लग्न केल्याने “या तीनही स्टुडंटना त्यांचं इश्कवाला लव्ह” मिळाल्याचे बरेच मीम्स सोशल मीडियावर शेअर होत आहेत. या तिघांच्या लग्नातील फोटोसह ही मीम्स शेअर होत आहेत. यापैकी आलिया आणि रणबीरला कन्यारत्नसुद्धा झालं आहे.