Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या छोटा मुलगा अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. १ मार्चपासून सुरू झालेला प्री-वेडिंग सोहळा काल ३ मार्चला संपला. या तीन दिवसांच्या सोहळ्याची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात झाली. सध्या अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच करीना कपूर व सैफ अली खानचा लहान मुलगा जेह अली खानच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेहच्या या कृतीमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात करीना कपूर, सैफ अली खान आपल्या दोन मुलांसह पाहायला मिळाले. आज हे पतौडी कुटुंब हा प्री-वेडिंगचा सोहळा आटापून मुंबईत पोहोचले आहेत. जामनगरमधून रवाना होतानाचा जेह अली खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये करीना, सैफ अली खानचा लाडका मुलगा जेह पापाराझींना चिडवताना दिसत आहे. हा व्हिडीओ ‘फिल्मी ग्नान’ या एंटरटेन्मेंट इन्स्टाग्रामवर पेजवर शेअर करण्यात आला आहे. याच व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर जेह आला आहे.

हेही वाचा – Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये शाहरुख खानचा पत्नीसह रोमँटिक डान्स पाहिलात का? व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “हे काय शिकवलं आहे?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “संस्कार नसलेली मुलं.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “दोघा मुलांनाही संस्कार नाहीयेत. यांना पाहिल्यावर माझी चिडचिड होते.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “जशी आई तशी मुलं.”

हेही वाचा – Video: अंबानींच्या होणाऱ्या सूनेची ग्रँड एन्ट्री, K3G चित्रपटातील गाण्यावरील राधिका मर्चंटच्या डान्सने जिंकली मनं

दरम्यान, अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तर रणबीर कपूर-आलिया भट्ट आकाश अंबानी-श्लोका मेहतासह ‘केसरिया’ या गाण्यावर थिरकले. तिसऱ्या दिवशी, काल सर्व पाहुणे मंडळींना जामनगर व वनतारा फिरवलं आणि रात्री भव्य महाआरती, हस्ताक्षर सेरेमनी झाली. अशा प्रकारे अनंत-राधिका यांचा प्री-वेडिंग सोहळा धुमधडाक्यात झाला. आता सर्व पाहुणे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत.