Kareena Kapoor Meera Rajput Show : बॉलीवूडमध्ये कधी काय घडेल याचा काहीच नेम नाही. करीना कपूरचा प्रसिद्ध टॉक शो ‘व्हॉट वूमन वॉन्ट’च्या (What Women Want) आगामी एपिसोडमध्ये तिचा एक्स-बॉयफ्रेंड शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूतने खास हजेरी लावली आहे. या दोन्ही ग्लॅमरस अभिनेत्रींना एकत्र पाहून प्रेक्षक आणि चाहते प्रचंड थक्क झाले आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये करीनाने मीराला तिसऱ्या बाळाच्या अफवेबाबत विचारले असता, मीराने दिलेलं उत्तर व्हायरल झालं आहे.

करीना कपूरचा टॉक शो ‘व्हॉट वूमन वॉन्ट’मध्ये मीरा राजपूत पाहुणी म्हणून पोहोचली. मीरा ही करीनाचा एक्स शाहीद कपूरची पत्नी आहे. त्यामुळे या दोघींचं एकत्र येणं हा चाहत्यांसाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. अशातच दोघींचा एक प्रोमो नुकताच इंटरनेटवर रिलीज झाला आहे. यातील करीना आणि मीराच्या मजेशीर संवादाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

पाहा प्रोमो

प्रोमोमध्ये करीना म्हणाली, “तू आणि मी एकत्र आलो आहोत, हे पाहून सगळेच खूप उत्सुक आहेत.” त्यानंतर तिने मीराला स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मोठी अफवा कोणती, असा प्रश्न विचारला. त्यावर मीरा म्हणाली, “मला अजून एक मूल होणार आहे, ही अफवा.” यावर करीना मस्करी करत म्हणाली, “होणार आहे का.” मीराने हसत उत्तर दिलं, “अजिबात नाही, आमचं ठरलंय, आता बस.”

Kareena and Mira on Mirchi Talk show
byu/Both-Measurement-731 inBollyBlindsNGossip

हा प्रोमो सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर तुफान व्हायरल झाला आहे. रेडिटवर एका युजरने लिहिलं, “ज्या कोणी या दोघींना एकत्र आणलं, त्याचं खरंच कौतुक आहे. ९० च्या दशकातील लोकांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की असं काही घडेल.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “हे पाहून मी थक्क झालोय. हा एपिसोड खूप गाजणार आहे.”

दरम्यान, शाहीद कपूर व करीना कपूर यांचं अफेअर सर्वश्रूत होतं. २००४ मध्ये ते डेट करू लागले आणि २००७ मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर करीना सैफ अली खानच्या प्रेमात पडली आणि पाच वर्षे डेट केल्यावर २०१२ मध्ये लग्न केलं. तर, शाहीद कपूरने मीरा राजपूतशी २०२५ मध्ये अरेंज मॅरेज केलं. सैफ व करीनाला तैमूर व जेह ही दोन मुलं आहेत. तर मीरा व शाहीदला मिशा व झैन कपूर ही दोन अपत्ये आहेत.