बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून करीना कपूर ओळखली जाते. गेली अनेक वर्षे तिने उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करीत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. तिचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. करीनादेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. पण आता तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी तिच्यावर संतापले आहेत.
हेही वाचा- “सर्व मुस्लिमांना एका रंगात…”, नसीरुद्दीन शाहांची मोदी सरकारवर टीका; मुघलांचा उल्लेख करीत म्हणाले…
ग्रॅण्ड प्रिक्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी करिना मोनॅकोला गेली होती. तिथून परतत असताना ती मुंबई विमानतळावर दिसली. या दरम्यान एक चाहती सेल्फी घेण्यासाठी करीनाजवळ आली पण करीनाने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेली. एवढंच नाही तर सुरक्षारक्षकानेही चाहतीला हातवारे करून करीनापासून दूर राहण्यास सांगितले. करीनाची ही अहंकारी वृत्ती पाहून तिचे चाहते तिच्यावर प्रचंड नाराज दिसत आहेत. सोशल मीडियावर चाहते सध्या करीनाला ट्रोल करत आहेत.
करीनाचे हे वागणे नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही आणि यावरून त्यांनी करीनाला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, अरे हे खूप वाईट आहे ती खूप उद्धट वागते. तिला फक्त चाहतीबरोबर सेल्फी घ्यायची होती. पण मला समजत नाही की या बॉलीवूड स्टार्सचा एवढा अहंकार का आहे? म्हणूनच मला ते कधीच आवडत नाहीत, हे फक्त चित्रपटात दयाळू होण्याचा अभिनय करतात, वास्तवात बघा”. तर दुसरा नेटकरी म्हणाला,’करीना, तू चाहत्यांशिवाय काहीच नाहीस.’ आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “तिची ही वागणूक लवकरच तिला जमिनीवर आणेल.”
काही दिवसांपूर्वी करीना कपूरचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. करीना सैफ अली खानबरोबर डिनर डेटवर गेली होती. तेव्हा एक चाहती तिच्याशी हात मिळविण्यासाठी पुढे आली होती. पण करीनाचा अंगरक्षक तिच्या चाहतीला दूर सारत होता. वारंवार ती करीनाशी हात मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होती. पण करीनाचा अंगरक्षक तिला करीनाच्या वाटेतून दूर करत होता. अनेकदा ती, “मॅडम, एकदा हात मिळवा,” असे म्हणत होती. पण करीनाने फक्त तिच्याकडे पाहून हसून तिच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. करीनाच्या या वागणूकीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते.