अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला. गुजरातमधील जामनगर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात जगभरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. इतकेच नाही, तर या प्री-वेडिंग सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील उद्योगपतीही जामनगरला पोहोचले होते.

अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सलमान खान, शाहरुख खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, करीना कपूर, सैफ अली खान यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. सोहळ्याच्या शेवटच्या म्हणजे तिसऱ्या दिवशी भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांच्या हस्ताक्षर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंबानी कुटुंबासह बॉलीवूड कलाकारांनी पारंपरिक लूक परिधान केला होता. या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते करीना कपूरच्या लूकने.

हेही वाचा- माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासह जान्हवीची अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगला हजेरी, बॉयफ्रेंडच्या भावासह केला डान्स, पाहा Photos

करीनाने सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी सोनेरी रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते करीनाच्या गळ्यातील नेकलेसने. करीनाने या ड्रेसवर एक चोकर नेकलेस घातला होता. हा नेकलेस तिने तिच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीतही घातला होता. २०१२ मध्ये करीना व सैफने लग्न केल्यानंतर दोघांनी दिल्लीत रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी करीनाने हा नेकलेस घातला होता.

सोशल मीडियावर करीनाचा हा लूक मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या या कृतीचे कौतुक केले आहे; तर काहींनी लग्नातील नेकलेस घातल्याने ट्रोल केले आहे. एकाने कमेंट करीत लिहिले, “करीनाकडे दागिन्यांची कमतरता नसली तरी तिने जुने दागिने पुन्हा घालून मध्यमवर्गीय असल्याची भावना निर्माण केली आहे.” तर, काहींनी तिच्या लूकची प्रशंसाही केली आहे.