बॉलीवूडची बेबो करीना कपूर अभिनयासह तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘अशोका’ चित्रपटातील करीनाचं “सन सनन…” गाणं सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. २३ वर्षानंतर व्हायरल होत असलेल्या या अशोका ट्रेंडबद्दल करीनाने आपलं मत व्यक्त केलंय.

नुकत्याच ‘ग्राझिया इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत या ट्रेंडबद्दल बोलताना करीना म्हणाली, “मला वाटतं की हे खूप आश्चर्यकारक आहे कारण २० वर्षांनंतर हे गाण अशाप्रकारे व्हायरल होणं हे खरंच खूप भारी आहे. जेव्हा आम्ही या गाण्याचं शूट करत होतो तेव्हाच हे गाणं इतकं आयकॉनिक असेल हे माहित होतं. अंगावरील ते टॅटू, डोळ्यांचा तो मेकअप सगळंच खूप छान होतं.”

हेही वाचा… “अतिशय वेगळा असा आळस…”, ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने शेअर केला गणीबरोबर ‘खास’ व्हिडीओ; म्हणाली…

करीना पुढे म्हणाली की, “माझी जी कौरवाकी ही भूमिका होती ती निडर, निर्भय होती म्हणून माझा मेकअपदेखील तसाच वेगळा हवा होता. खरंतर तेव्हा माझ्या चेहऱ्यावर अजिबात मेकअप केला नव्हता. फक्त माझ्या डोळ्यांभोवती काही डिझाईन्स केल्या होता पण एक अंशसुद्धा मेकअप त्यावेळेस मी केला नव्हता. मला माहित नाही आता यावर किती जणांना विश्वास बसेल. मी तेव्हा फक्त २२ वर्षांची होते आणि त्यावेळेस पूर्ण चेहऱ्यावर आणि अंगावर टॅटू असणं या भावनेनेचं मला खूप कूल वाटतं होतं.”

अशोका ट्रेंड

अशोका ब्यूटी ट्रेंड सध्या सगळ्याच सोशल मीडिया अ‍ॅप्सवर ट्रेंडिंग आहे. जगभरातले लाखो लोक हा ट्रेंड फॉलो करतायत. अशोका चित्रपटातील “सन सनन…” या गाण्यावर ब्यूटी इन्फ्लुएंसर्स आणि मेकअप आर्टिस्ट त्यांच्या मेकअप करतानाच्या स्टेप्स दाखवत हा ट्रेंड फॉलो करतायत. अनेकांनी करीनाने ‘अशोका’ चित्रपटात केलेल्या लूकप्रमाणेच त्यांचा लूक तयार केला आहे. परप्रांतीय सोशल मीडिया युजर्स भारतीय पद्धतीचा मेकअप करून तो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अनेकांनी तर यावर डान्सदेखील केला आहे.

हेही वाचा… ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलंत का? मराठीसह हिंदी, गुजराती, कन्नड… अशा अनेक भाषेतील चित्रपटांमध्ये केलंय काम

दरम्यान, करीनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, करीना ‘क्रू’ या चित्रपटात शेवटची झळकली होती. या चित्रपटात करीनाबरोबर क्रिती सेनॉन आणि तब्बू यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. करीना लवकरच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे कलाकारदेखील आहेत.