Kareena Kapoor Khan on Taimur-Jeh screen time: सैफ अली खान आणि करीना कपूर अनेकदा त्यांच्या मुलांबद्दल म्हणजेच तैमुर व जेहबद्दल बोलत असतात. आता करीनाने स्क्रीनला दिलेल्या एका मुलाखतीत मुलांच्या मोबाईल आणि लॅपटॉप वापरण्याबद्दल तिने वक्तव्य केले.

तैमुर-जेहच्या स्क्रीन टाईमवरून सैफ अली खान अन् करीना कपूरमध्ये होतो वाद

एक्सप्रेसो सेशन(Expresso Session)मध्ये करीनाने हजेरी लावली होती. तिला तैमुर व जेह हे लॅपटॉप आणि मोबाईल वापरतात का, याबद्दल विचारले. ती म्हणाली, “त्यांना फोन वापरण्याची परवानगी नाही. तैमुरच्या नॅनीकडे फोन आहे. तर तो फोन त्याचाच असल्याचे तो इतरांना सांगतो. मी त्याला सांगितले आहे की हा तुझा फोन नाही. मग त्याने मला विचारले की तो त्याच्या मित्रांना सांगू शकतो का, हा त्याचाच फोन आहे. त्यालाही मी नकार दिला आहे.

मला या संपूर्ण डिजिटल गोष्टीचं खूप टेन्शन येतं. पण मग तो मला आठवण करून देतो की मी आणि सैफही फोनवर बोलतो. मुलं दिवसभर गेम खेळत बसली की अक्षरशः मला त्यांच्या हातातून फोन हिसकावून घ्यावे लागतात.”

मुलांच्या स्क्रीन टाईमबद्दल पती सैफची काय प्रतिक्रिया असते, याबद्दलही करीनाने सांगितले. ती म्हणाली, “सैफला वाटतं की मी या सगळ्याबाबत खूपच काळजी करते. त्यामुळे मी थोडं शांत व्हायला हवं. पण मी त्याला सांगते की, या विषयाबाबत मला लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे कदाचित हाच एक विषय आहे, ज्यावरून आमच्यात वाद होतो. मला माझ्या मुलांनी शक्य तितका काळ लहानच राहावं असं मला कायमच वाटतं.”

करीनाने तंत्रज्ञान आणि AI चे नकारात्मक काय परिणाम आहेत, तसेच त्याचा मुलांवर काय परिणाम होतो, याबद्दलही वक्तव्य केले. ती म्हणाली, “मला काळाबरोबर पुढं जायचं आहे. पण, त्याचा धोका नसला पाहिजे. जर तसं होणार असेल, तर आपल्याला त्यावर काहीतरी मार्ग शोधावा लागेल. सध्या माझी मुलं खूप लहान आहेत आणि मला याबाबत भीती वाटते. मी एक आई आहे. एआयच्या काही गोष्टींमुळे मला चिंता वाटते. आपल्याला यावर मार्ग शोधावा लागेल. काही गोष्टींवर बंदी घालावी लागेल आणि काही गोष्टींसाठी त्याचा वापर करावा लागेल.

करीना कपूरबरोबरच दायरा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या संपूर्ण टीमने एक्सप्रेसोच्या सत्रात हजेरी लावली होती.