scorecardresearch

“ही परिस्थिती…” धाकट्या लेकाच्या वाढदिवशी करीना कपूर असं का म्हणाली? जाणून घ्या

तिच्या या फोटोवर आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी कमेंट केली आहे.

Kareena Kapoor jeh birthday

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा धाकटा मुलगा जेहसाठी आज फार महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज (२१ फेब्रुवारी) तो त्याचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने खान आणि कपूर कुटुंबातील अनेक जण त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच करीनाने तिचा लाडका लेक जेह साठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे ती चर्चेत आहे.

करीना कपूर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने तिचा लाडका लेक जेहला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर जेहचे काही फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोत जेह हा करीनापासून लांब जात नसल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत जेह हा रागात कोणाकडे तरी पाहताना दिसत आहे.
आणखी वाचा : “कंडोम वापरायचं नाही असं…” प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

या फोटोला कॅप्शन देताना करीना म्हणाली, “माझ्या लेकाला मला सोडून दूर जावेसे वाटत नाही. पण ही परिस्थिती लवकरच बदलेल. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करते. जेह बाबा…! वाढदिवसाच्या शुभेच्छा मुला. या फोटोंसाठी @khamkhaphotoartist चे खास आभार.”

करीनाने शेअर केलेले जेहचे हे फोटो लंडनमधील चित्रपटाच्या शूटींगचे आहेत. तिच्या या फोटोवर आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी कमेंट केली आहे. तिने जेह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे म्हटलं आहे.

आणखी वाचा : Video : ‘तारक मेहता…’ मालिकेतील दयाबेनचा नवा व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची झाली अशी अवस्था

दरम्यान करीना ही लवकरच ओटीटी या माध्यमावर झळकणार आहे. सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित थ्रिलर चित्रपटातून ती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. त्याबरोबरच ती हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 18:39 IST
ताज्या बातम्या