scorecardresearch

“…म्हणून मी इतकी वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होते,” अखेर करिश्मा कपूरने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूरने अभिनयाने ९०चं दशक गाजवलं होतं.

karishma kapoor

बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूरने अभिनयाने ९०चं दशक गाजवलं होतं. ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘कुली नं १’ अशा चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. ९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली करिष्मा गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता अखेर तिने स्वतः यामागचं कारण सांगितलं आहे.

करिश्मा कपूर पुन्हा एकदा पडद्यावर पुनरागमन करत आहे. मर्डर मुबारक हा चित्रपट पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर या निमित्ताने सध्या ती अनेक मुलाखती देत आहे. आता ‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिने गेली काही वर्ष मनोरंजन सृष्टीतून ब्रेक का घेतला होता हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : “अभिषेक-करिश्मा यांचं लग्न मोडलं कारण…” दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी २० वर्षांनी केला खुलासा

ती म्हणाली, “सिनेसृष्टीतून ब्रेक घेणं ही माझी चॉईस होती. मी लहान वयातच म्हणजे शाळेनंतर काम करायला सुरुवात केली. अनेक वर्ष मी दिवसातून तीन किंवा चार शिफ्ट्समध्ये काम केलं आहे. मी दरवर्षी ८ ते १० चित्रपट प्रदर्शित करायचे. मी खूप काम केलं आणि त्यामुळे मी खूप थकले होते. नंतर मी चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचं ठरवलं कारण मला १०० दिवसांच्या लांब आऊटडोअर शूट शेड्यूलसाठी जायचं नव्हतं.”

पुढे ती म्हणाली, “मला कमबॅक हा टॅग अजिबात आवडत नाही. त्याचा वापर विशेषतः महिलांसाठी केला जातो.” आता सध्या तिचं हे बोलणं खूप चर्चेत आलं आहे. तर आता मोठ्या कालावधीनंतर ती चित्रपटामध्ये काम करण्यासाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

आता लवकरच ‘मर्डर मुबारक’ या चित्रपटात ती दिसणार आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच करिश्माने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत सारा अली खान आणि अर्जुन कपूरही दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 15:45 IST
ताज्या बातम्या