अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून तिच्या अभिनय-कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, या शोमधून करिश्माला फारशी ओळख मिळाली नाही. अनेक संघर्षांचा सामना करणाऱ्या करिश्माने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवास केला आहे. टीव्हीमधून बाहेर पडल्यानंतर ती बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपले अभिनयकौशल्य दाखवत आहे. नुकतीच करिश्माने तिच्या संघर्षकाळातील एक आठवण सांगितली आहे.
करिश्मा म्हणाली, “मला सांगण्यात आले, ‘तू खूप उंच आहेस, तू रोज टीव्हीवर दिसतेस. आम्ही तुला घेऊ शकत नाही. तू या भूमिकेसाठी खूप ग्लॅमरस आहेस. जेव्हा निर्माते तुम्हाला एखाद्या चित्रपटात कास्ट करू इच्छित नाहीत, तेव्हा ते बरीच कारणे सांगतात.”




हेही वाचा- अरिजित सिंहचा चंदीगढमधील कॉन्सर्ट रद्द; ‘या’ कारणाने आयोजकांकडून FIR दाखल
करिश्माने बॉलीवूडमधल्या नवीन चेहऱ्यांच्या कॉन्सेप्टवरही भाष्य केले आहे. करिश्मा म्हणाली, “भूमिका करण्यासाठी एका कलाकाराची गरज आहे. पण हे नवीन चेहरा कॉन्सेप्ट काय आहे? जसा तो टीव्ही कलाकार असेल तर त्याला कास्ट करू नका. चला, नवीन चेहरा घेऊ या. नवीन चेहरा म्हणजे काय ते मला समजत नाही. नवीन चेहऱ्याची ही संकल्पना काय आहे? फार कमी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा यापेक्षा वेगळा दृष्टिकोन आहे,” असे करिश्मा म्हणाली.
हेही वाचा- Video : “हा मूर्खपणा…”; सलमानकडून मिळालेल्या ‘त्या’ वागणुकीवर विकी कौशलने सोडलं मौन, म्हणाला…
करिश्मा तन्नाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिश्माने रणबीर कपूरच्या ‘संजू’मध्येदेखील एक छोटीशी भूमिका निभावली होती. याबरोबरच करिश्मा बऱ्याच रिअॅलिटी शोमध्येसुद्धा झळकली आहे. आता लवकरच तिची ‘स्कूप’ ही हंसल मेहता दिग्दर्शित वेब सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.