scorecardresearch

Premium

कार्तिक-कियाराच्या ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाची ११ व्या दिवशी दमदार कमाई; ‘आदिपुरुष’ला टाकलं मागे

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटानं ११व्या दिवशी किती कमाई केली, जाणून घ्या

satyaprem ki katha and adipurush
'सत्यप्रेम की कथा' चित्रपटानं ११व्या दिवशी किती कमाई केली, जाणून घ्या (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानं ११ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाची कामगिरी धीम्या गतीनं सुरू झाली होती. त्यानंतर दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मग थेट ११व्या दिवशी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानं मोठा गल्ला जमवला आहे.

Sacnilkच्या वृत्तानुसार सहा दिवसांनंतर रविवारी ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटानं पुन्हा बॉक्स ऑफिसवर दमदार एंट्री घेतली. म्हणजेच सहा दिवसांत जेवढी कमाई या चित्रपटानं केली, त्यापेक्षा जास्त कमाई ११ व्या दिवशी केली. कार्तिकच्या या चित्रपटानं रविवारी ५.२५ कोटींची कमाई केली. त्यामुळे आता एकूण ६६.०६ कोटींचा गल्ला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटानं जमवला आहे. या चित्रपटासाठी आलेला खर्च ६० कोटी रुपये वसूल झाल्याचं म्हटलं जात आहे.

subodh bhave teen adkun sitaram
“दोन-अडीच तास…”, ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपट पाहिल्यावर सुबोध भावेची प्रतिक्रिया
Siddharth on being forced to leave Chithha event in Bengaluru
“मी पैसे खर्च करून…”, राजकीय वादातून आंदोलकांनी चित्रपटाचं प्रमोशन थांबवल्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
/actress-prarthana-behere
“तीन वर्ष मी…”; प्रार्थना बेहरेने सांगितलं लग्नानंतर चित्रपटात न दिसण्यामागचं कारण
Pushpa 2 release date
बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर

हेही वाचा – “मला तरी कुठे मिळालंय पारितोषिक?” केदार शिंदेंनी ‘ती’च्यासाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले, “तिची निवड झाली नाही तर…”

हेही वाचा – “वडिलांचं नाव धुळीत…” असं म्हणत महिलेनं अभिषेक बच्चनच्या लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं?

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या ११ व्या दिवशी झालेल्या कमाईची तुलना ‘आदिपुरुष’बरोबर केली जात आहे. कार्तिकच्या चित्रपटानं प्रभासच्या चित्रपटाला मागे टाकल्याचं दिसत आहे. ‘आदिपुरुष’नं ११ व्या दिवशी २.१३ कोटींची कमाई केली होती. या दोन्ही चित्रपटांच्या कमाईत फक्त एवढाच फरक होता की, ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या ११ व्या दिवशी रविवार होता; तर ‘आदिपुरुष’च्या ११ व्या दिवशी सोमवार होता.

हेही वाचा – ‘आदिपुरुष’मधील कुंभकर्ण दररोज २० पोळ्या, २५ अंडी व १ किलो खायचा चिकन, कोण आहे ‘हा’ अभिनेता जाणून घ्या

कार्तिक-कियाराच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांसनं सांभाळली. या चित्रपटात सुप्रिया पाठक आणि गजरात रावदेखील महत्त्वाच्या भूमिकांत आहेत. या दोघांनी कार्तिकच्या पालकांची भूमिका साकारली आहे; तर अनुराधा पटेल व सिद्धार्थ रांदेरिया हे कियाराच्या आई-वडिलांच्या भूमिकांत आहेत. शिवाय या चित्रपटात राजपाल यादवही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kartik aaryan and kiara advani starring satyaprem ki katha 11 day boc office collection pps

First published on: 10-07-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×