कार्तिक आर्यन बॉलिवूडनंतर आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज, म्हणाला... | Kartik aaryan said that he wants to work in south films | Loksatta

कार्तिक आर्यन बॉलिवूडनंतर आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज, म्हणाला…

‘फ्रेडी’च्या यशानंतर कार्तिक त्याच्या पुढच्या चित्रपटांच्या तयारीला लागला आहे.

कार्तिक आर्यन बॉलिवूडनंतर आता दक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकण्यासाठी सज्ज, म्हणाला…

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या ‘फ्रेडी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘फ्रेडी’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘फ्रेडी’च्या यशानंतर आता कार्तिक त्याच्या पुढच्या चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कार्तिक आर्यनने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्याने त्याच्या भविष्यातील प्लॅन्सचा उलगडा केला. तो म्हणाला, “जर स्क्रिप्ट उत्कृष्ट असेल तर मी कोणत्याही भाषेतील चित्रपटात काम करायला तयार आहे. मला तेलुगू किंवा तामिळ चित्रपटात काम करायचे आहे. चित्रपटातील माझ्या अभिनयातून मला चित्रपट निर्मात्यांना खात्री करून द्यायची आहे की, माझ्यापेक्षा चांगली भूमिका त्या चित्रपटात दुसरं कोणीही करू शकलं नसतं.”

आणखी वाचा : Photos: मुलीच्या जन्मानंतर ‘अशी’ झाली आहे आलियाची अवस्था; फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

पुढे कार्तिक म्हणाला, “मला नेहमीच सर्वोत्कृष्ट अभिनेता बनायचे होते आणि स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण करायचे होते. चित्रपट निर्मात्यांची पहिली पसंती मला असायला हवी आणि आज मी त्या टप्प्यावर पोहोचलो आहे जिथे मला स्वतःला पाहायचे होते.”

हेही वाचा : “माझ्या आयुष्यातील…”; हृतिक रोशनच्या बहिणीबरोबर रंगत असलेल्या अफेअरच्या चर्चांवर कार्तिक आर्यनने सोडलं मौन

कार्तिक आर्यनचे नाव बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये घेतले जाते. अलीकडेच ‘हॉटस्टार’वर प्रदर्शित झालेल्या ‘फ्रेडी’ या चित्रपटातून कार्तिक प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. यानंतर आता कार्तिक ‘शेहजादा’, ‘सत्यप्रेम की कथा’, ‘आशिकी ३’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 09:44 IST
Next Story
“…म्हणून माझ्याऐवजी मलायकाची निवड झाली” शिल्पा शिरोडकरने सांगितलं ‘छैया छैया’ गाण्यात तिला न घेण्यामागचं कारण