‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुपी’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘भूल भुलैया ३’ या आणि अशा अनेक चित्रपटातून कार्तिक आर्यनने मोठी पसंती मिळवली आहे. सध्या कार्तिक ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. नुकतीच त्याने ‘स्क्रीन’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने यशाचं आतापर्यंतचं शिखर गाठण्याआधी किती संघर्ष केला याची माहिती सांगितली आहे.

प्रत्येक कलाकाराला यशाचं फळ चाखण्याआधी मोठा संघर्ष करावा लागतो. या संघर्षाच्या काळात अनेकजण खचून जातात आणि माघार घेतात. मात्र, वारंवार ऑडिशनमध्ये नकार मिळूनसुद्धा कार्तिकने यश मिळेपर्यंत हार मानली नाही. शोमध्ये बोलताना त्याने सांगितलं, ” ‘प्यार का पंचनामा’ हा माझा पहिला चित्रपट आहे. मात्र, हा चित्रपट मिळवण्याआधी मला फार संघर्ष करावा लागाला. जवळपास ४ वर्षे मी ऑडिशन देत होतो आणि मला रिजेक्ट केलं जात होतं. परंतू ‘प्यार का पंचनामा’ने मला एका रात्रीत मोठं स्टार बनवलं.”

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
jaideep ahlawat on nepotizam and alia bhatt
‘पाताल लोक’ फेम जयदीप अहलावतचे नेपोटिझमवर भाष्य; आलिया भट्टबद्दल म्हणाला, “त्यात तिची चूक काय?”
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Sanjay Raut Slam BJP
Sanjay Raut : शिवसेनेत ‘उदय’ होणार यावर राऊत ठाम, चंद्राबाबू आणि नितीश कुमारांच्या पक्षाबद्दलही केला मोठा दावा; म्हणाले, “यांच्या तोंडाला रक्त…”

हेही वाचा : भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…

कार्तिक पुढे म्हणाला, “अनेक तरुण येथे मला हिरो व्हायचं आहे ही भावना मनात घेऊन येतात. मीदेखील त्यांच्यातीलच एक होतो. मी बऱ्याच ठिकाणी ऑडिशन दिल्या होत्या. मात्र, मला प्रत्येक ठिकाणी नकार मिळत होता. मला माझी क्षमता माहिती होती, पण मी माझं नशीब बघत होतो. ४ वर्षे असे केल्यानंतर शेवटी मला माझा पहिला चित्रपट मिळाला, या संधीसाठी मी कायम आभारी आहे.”

“एवढ्यावेळा नकार मिळाल्यावर पुढे जाण्याच्या विचारात कधी काही बदल झाला का?”, असा प्रश्न त्याला मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावेळी कार्तिक म्हणाला, “मला सवय झाली होती आणि मला कसली लाजसुद्धा वाटत नव्हती. ही भूमिका तुझ्यासाठी बनलेली नाही, असं मला रोज ऐकायला मिळत होतं. मला माहिती होतं माझ्याकडे गमवण्यासारखं काहीही नाही. त्यामुळे मी हार मानली नाही. स्वत:चे काम पूर्ण होण्यासाठी तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणे फार महत्वाचे आहे. आत्मविश्वास आणि अथक परिश्रम या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास तुम्हाला यश नक्की मिळते. मीदेखील तेच केले आणि मला हव्या असलेल्या गोष्टींवर यश मिळवले. त्यानंतर सर्वकाही ठीक आणि सुरळीत झाले.”

हेही वाचा : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर रवीना टंडनने वांद्रे परिसरातील सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाली, “सेलिब्रिटींना टार्गेट…”

कार्तिकने साल २०११ मध्ये सिनेविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. त्यानंतर आता जवळपास १५ वर्षांच्या काळात त्याने मोठ्या मेहनतीने एका हरहुन्नरी अभिनेत्याच्या रुपात स्वत:ला तयार केलं आहे. अभिनयातील कामामुळे त्याला आजवर विविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आलं आहे.

Story img Loader