कॉमेडियन कृष्णा अभिषेक व त्याची पत्नी अभिनेत्री कश्मीरा शाह सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. कश्मीरा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखली जाते. बऱ्याचदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. काही दिवसांपूर्वीच कृष्णा व कश्मीराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये कश्मीरा कृष्णाला किस करताना दिसली होती.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या पत्नीला पाहिलंत का? लेकही दिसते फारच सुंदर

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांना रोहित शर्माने थांबवलं? व्हीडिओ होतोय व्हायरल

एका पार्टीमध्येय कश्मीरा व कृष्णा पोहोचले होते. या पार्टीमध्ये ‘बिग बॉस १६’ फेम प्रियांका चौधरीही होती. पार्टीमधून बाहेर पडताना कश्मीराने कृष्णाला किस केलं पण त्याचबरोबरीने तिने प्रियांकालाही किस केलं. यावरुनच कश्मीराला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता याबाबत कश्मीराने भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – अशी दिसते देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांची लेक, खास पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “दिविजा तुला…”

‘ईटाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कश्मीरा म्हणाली, “हा मला माहित आहे की, लोकांना असं वाटलं की मी खूप नशेमध्ये आहे. मला नीट उभंही राहता येत नव्हतं असंही काही लोकांना वाटलं. नशा करुन मी असं वागत आहे असं बोलण्यात आलं. पण यामागचं कारण काही वेगळंच होतं. मी लांबचा प्रवास करुन आले होते. मी अमेरिकेमधून आले होते”.

“प्रवासामधून मी घरी आले त्यानंतर लगेचच मी पार्टीला गेले. माझ्या हातात वाईनचा ग्लासही होता. त्यामुळे कदाचित माझं वागणं बदललं असेल. त्यावेळी मी माझ्या पतीला सारखं जवळ ओढत होती. कारण मी त्याला खूप दिवसांनी भेटले होते. जवळपास ३ आठवडे मी त्याच्यापासून लांब होते. म्हणूनच मी त्याला सगळ्यांसमोरच किस केलं”. कश्मीराने ट्रोलर्सला तिच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं आहे.