kashmir files director vivek agnihotri launched book based on lal bahadur shastry death mystry spg 93 | लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली मोठी घोषणा | Loksatta

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली ‘मोठी’ घोषणा

विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत.

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केली ‘मोठी’ घोषणा
bollywood director

विवेक अग्निहोत्री हे नाव सध्या चर्चेत आहे. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. अनेकांनी या चित्रपटाचे आणि विवेक अग्निहोत्रींचे कौतुक केले. हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतदेखील होता. विवेक अग्निहोत्री सातत्याने बॉलिवूड, घराणेशाही यावर टीका करत असतात. ‘ताश्कंत फाईल्स’, ‘द काश्मीर फाईल्स’नंतर आता विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. २ ऑक्टोबरचे औचित्य साधून त्यांनी लिहिलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावरील पुस्तक आता वाचकांच्या भेटीस येणार आहे. आपल्या ट्विटरवर अकाऊंटनवरून त्यांनी ही माहिती दिली.

ताश्कंत फाईल्स हा चित्रपट लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित चित्रपट होता. या चित्रपटाचेदेखील कौतुक झाला होते. याच धर्तीवर त्यांनी पुस्तक लिहले असून आपल्या ट्विटमध्ये ते असं म्हणाले आहेत, ‘तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त भारतातील सर्वोत्कृष्ट असे पुस्तक who killed shahstri आता हिंदी भाषेत उपलब्ध’, असं ट्विट करत पुस्तकाचा फोटोदेखील शेअर केला आहे.

एका मुलीच्या आत्मसन्मानाची लढाई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! मालिकेचा प्रोमो चर्चेत

लाल बहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा मोलाचा वाटा होता. ताश्कंत येथे ते गेले असताना त्यांचा मृत्यू झाला. विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेचा अभ्यास करून ताश्कंत फाईल्स चित्रपट बनवला होता. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, नसरुद्दिन शाह मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१९ साली प्रदर्शित झाला होता.

‘द काश्मीर फाईल्स’नंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याचा खुलासा केला होता. दरम्यान, या सीरिजचा विषय कोणता, त्यात कोणते अभिनेते असणार, ती केव्हा प्रदर्शित होणार याविषयी कोणताही खुलासा अद्याप केलं गेलेला नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
अमिताभ बच्चन यांना पत्नी जया यांनी म्हटलं ‘बुड्ढा’, म्हणाल्या “माझ्या मैत्रिणी घरी येतात तेव्हा…”

संबंधित बातम्या

“आता मंदाकिनी हो..” ट्विंकल खन्नानं सांगितली दिग्दर्शकाच्या फर्माईशीची आठवण
अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी कियारा जाहीर करणार तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख
रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सर्कस’चा टीझर प्रदर्शित; ६० च्या दशकातील कहाणी आणि कॉमेडीचा डबल डोस
“मी सेक्ससाठी वेडी…” जितेंद्रपासून वेगळं झाल्यानंतर रेखा यांनी केलेलं बोल्ड वक्तव्य
“मी आयुष्याची वाट लावून घेतली होती त्याला आई जबाबदार…” प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षकासह पतीच सापळ्यात अडकला; औरंगाबाद येथील पथकाची कारवाई
बाईक टॅक्सी ॲपवर १० डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन; पुण्यातील रिक्षाचालकांचा बंद अखेर मागे
“हा प्रोपगंडा आणि वल्गर चित्रपट…” IFFI मध्ये मुख्य ज्यूरींनीच साधला ‘द काश्मीर फाईल्स’वर निशाणा
VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी
हायकोर्ट नगर रचनाकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती