Katrina Kaif New Look Viral: बॉलीवूडची ‘बार्बी डॉल’ कतरिना कैफ सध्या तिच्या एका नवीन व्हिडीओमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पती विकी कौशलसोबत एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या कतरिनाने यावेळी परिधान केलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे आई झाल्यानंतरचा कतरिनाचा हा अवतार पाहून चाहत्यांना अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आठवण झाली आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर कतरिना फारशी सार्वजनिक ठिकाणी दिसली नव्हती. आता विकी कौशल आणि कतरिनाचा हा एकत्र व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी त्यांच्या लाडक्या जोडीवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मागच्या जवळपास दीड वर्षात कतरिना कैफ फक्त दोन ते तीन वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसली. छावा सिनेमाच्या प्रिमियरनंतर काही महिन्यांनी ती आई झाली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती गाडीत बसताना तिची झलक दिसली होती. पण आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच विकी कौशल व कतरिना एकत्र दिसले. यावेळी कतरिनाच्या लूकने लक्ष वेधून घेतले.

विकी कौशल व कतिरना कैफ यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काही पँट, काळा टी शर्ट व त्यावर ऑलिव्ह ग्रीन रंगाचं जॅकेट घातलंय. तसेच त्याने टोपी देखील घातली आहे. दुसरीकडे, कतरिना कैफने काळी पॅट, काळा टॉप व काळ्या रंगाचे लाँग जॅकेट घातलेय. इतकंच नाही तर, तिचे शूज व चश्माही काळ्या रंगाचा आहे.

पाहा कतरिना कैफ-विकी कौशलचा व्हिडीओ

कतरिना कैफचा हा लूक पाहून नेटकऱ्यांना ऐश्वर्या रायची आठवण झाली आहे. अलीकडे ऐश्वर्या राय सर्वाधिक काळ्या रंगाच्या कपड्यांमध्येच दिसते. एअरपोर्ट असो वा एखादा कार्यक्रम, ऐश्वर्या काळ्या रंगाचे कपडे परिधान करते. या व्हिडीओत कतरिनाने केसही अगदी ऐश्वर्या रायप्रमाणेच मोकळे सोडले आहेत. कतरिनाने हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चनसारखा लूक केल्याचं या व्हिडीओत दिसून येतंय.

दरम्यान, कतरिना कैफने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी मुलाला जन्म दिला. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचं नाव विहान ठेवलंय. ७ जानेवारी २०२६ रोजी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी या नावाची घोषणा केली. विहानचा अर्थ ‘पहाट’ किंवा ‘नवीन सुरुवात’ असा होतो. विहान या नावाचं विकी कौशलच्या चित्रपटाशीही खास कनेक्शन आहे. विकीने २०१९ मध्ये ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं नाव सुद्धा विहान होतं.

कतरिना कैफ सध्या रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ती तिचा मुलगा विहान व कुटुंबाबरोबर वेळ घालवतेय. कतरिनाने कामातून ब्रेक घेतला असून ती मातृत्वाचा आनंद घेत आहे. दुसरीकडे, विकी कौशल त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.