Katrina Kaif First Public Appearance After Son Vihaan Birth: अभिनेत्री कतरिना कैफ आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. कतरिना कैफ पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

मुलगा विहानच्या जन्मानंतर जवळपास तीन महिन्यांनी अभिनेत्री कतरिना कैफ मंगळवारी संध्याकाळी पहिल्यांदा मुंबईत दिसली. कतरिनाबरोबर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला होती.

कतरिना कैफने काळ्या रंगाचा हुडी आणि फेस मास्क घातला होता. कतरिना घाईत होती. ती पापाराझींना टाळत वेगाने तिच्या कारजवळ गेली. पण फोटोग्राफर्सनी कतरिना गाडीत बसल्यावर तिचे फोटो व व्हिडीओ काढले. कतरिनाने चेहऱ्याचा मास्क काढला नाही, पण पापाराझींकडे बघत तिने स्माईल दिली.

पाहा कतरिना कैफचा व्हिडीओ

कतरिना कैफचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलीवूडने शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कतरिना खूप दिवसांनी दिसली, कतरिना बाळाच्या जन्मानंतर खासगी आयुष्य जगतेय, कतरिना कैफच्या चेहऱ्यावर ग्लो दिसतोय, अशा कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

वर्षभरापूर्वी छावाच्या प्रिमियरला दिसली होती कतरिना

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. त्यानंतर कतरिनाने काही चित्रपटांमध्ये काम केलं आणि नंतर ब्रेक घेतला. कतरिना शेवटची वर्षभरापूर्वी पती विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये दिसली होती. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्याकडे गोड बातमी असल्याच्या चर्चा झाल्या. अखेर विकी व कतरिनाने पोस्ट करून प्रेग्नेन्सीची बातमी जाहीर केली.

कतरिना कैफने दिला मुलाला जन्म

कतरिना कैफने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी मुलाला जन्म दिला. कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या मुलाचे नाव विहान कौशल (Vihaan Kaushal) असे ठेवले आहे. ७ जानेवारी २०२६ रोजी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांनी या नावाची घोषणा केली. विहानचा अर्थ ‘पहाट’ किंवा ‘नवीन सुरुवात’ असा होतो. विहान या नावाचं विकी कौशलच्या चित्रपटाशीही खास कनेक्शन आहे. विकीने २०१९ मध्ये ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचं नाव सुद्धा विहान होतं. विकीने मेजर विहान सिंह शेरगिल ही भूमिका साकारली होती.