कतरिना कैफ बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. कतरिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हॅलेंटाइन्स डे निमित्त कतरिनाने तिच्या बेस्ट फ्रेंडबरोबर गॅलेंटाइन डे सेलिब्रेट केला. ‘Kay Beauty’ या कतरिनाच्या ब्युटी प्रोडक्स्ट ब्रँडच्या पेजवरुन तिच्यासह मैत्रिणींचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना बेस्ट फ्रेंड मिनी माथूर व करिश्मा कोहलीसह नेवर हॅव एव्हर हा गेम खेळताना दिसत आहे. कतरिनाची बेस्ट फ्रेंड “एक्सला नशेत फोन केला आहे” असं विचारते. यावर कतरिना हो असं उत्तर देते.

UFO spotted during solar eclipse viral video
सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
young boy jugaad video goes viral
एका तिकिटावर केली सर्व मित्रांनी यात्रेत एंट्री, तरुणाचा जुगाड पाहून डोकं धराल, व्हिडीओ होतोय व्हायरल
do you ever eat Wangi Bhaji
Viral Video : वांग्याची भजी कधी खाल्ली का? तरुण चालवतोय वांगी भजीचा स्टॉल, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा>> “पहिला व्हॅलेंटाइन, गिफ्ट, पहिल्यांदाच खालेला पिझ्झा अन्…”, हेमांगी कवीची नवऱ्यासाठी खास पोस्ट

हेही वाचा>> Video: राखीला जवळ घेतलं, किस केलं अन्…; अभिनेत्रीने शेअर केला आदिलबरोबरचा बेडरुममधील ‘तो’ व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

कतरिनाने या व्हिडीओमध्ये पुढे पती विकी कौशलचा फोन चेक केला असल्याचंही म्हटलं आहे. “मी जेव्हा बालिश होते तेव्हा विकीचा फोन चेक केला होता. पण आता मी समजूतदार झाली आहे. आणि यापुढे कधीच मी कोणाचाही फोन चेक करणार नाही. कुणी माझ्या समोर फोन घेऊन आलं तरीही मी बघणार नाही”, असं कतरिना म्हणाली आहे.

हेही वाचा>> पहिल्या पत्नीच्या दुसऱ्या लग्नाबाबत समजताच शालिन भानोत आश्चर्यचकित, म्हणाला “दलजित कौर आणि…”

कतरिना व विकी कौशलने ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. ‘फोन भूत’ या चित्रपटात कतरिना शेवटची दिसली होती. कतरिना सलमान खानच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच ती ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात विजय सेतुपथीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.