बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचा शाही विवाहसोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता. लग्नानंतर कतरिनाने विकीच्या संपूर्ण कुटुंबाला आपलंसं केलं. अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या सासू-सासऱ्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

कतरिना कैफने मिडडेशी संवाद साधताना पती विकी कौशलसह तिच्या सासू-सासऱ्यांचं कौतुक केलं. अभिनेत्री म्हणाली, “मी विकीला नेहमी सांगते बेबी तू ‘आर्टहाऊस फिल्म बफ’ आहेस. विविध भूमिकांमध्ये तो अगदी व्यवस्थित फिट होतो. एखादी भूमिका तो ज्या पद्धतीने साकारतो ते खरंच अविश्वसनीय आहे.”

हेही वाचा : लग्नानंतर प्रथमेश परबने जोडीने केली सत्यनारायण महापूजा! क्षितिजाने सासरी ‘असा’ केला गृहप्रवेश, पाहा फोटो

कतरिना पुढे म्हणाली, “मी सुद्धा एक कलाकार असल्याने विकी नवनवीन काय करतोय याची नेहमीच माझ्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असते. तो खरंच एक अष्टपैलू अभिनेता आहे. हे केवळ मी त्याची पत्नी आहे म्हणून बोलत नाही. तुम्ही सुद्धा त्याचा अभिनय पाहिलेला आहे.” विकी नुकताच ‘सॅम बहादूर’ चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवलं नसलं तरीही विकीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. आता लवकरच तो बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटामध्ये झळकणार आहे.

हेही वाचा : सुमीत पुसावळेची ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतून एक्झिट; भावुक पोस्ट करत म्हणाला, “जाताना एवढंच म्हणेन…”

पंजाबी कुटुंबात लग्न करण्याबद्दल आणि सासू-सासऱ्यांविषयी सांगताना कतरिना म्हणाली, “लग्न म्हणजे दोन मोठी कुटुंब एकत्र येतात. आमच्या लग्नाला अनेकजण पंजाबहून आले होते ज्यांना मी पहिल्यांदाच भेटले. त्यात आमचं कुटुंबही खूप मोठं आहे. मला एकूण सहा बहिणी आहेत. त्यामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांनी लग्नात खूप मजा केली. माझ्या लग्नानंतर मला घरी भरपूर प्रेम, चमचमीत पदार्थ खायला मिळतात. सरसों का साग, मक्क्याची रोटी आणि त्यावर लोणी हे माझे आवडते पदार्थ आहेत.”

“मला सासरी सर्वांकडून खूप प्रेम मिळतं. विकीच्या आई-बाबांनी त्यांच्या दोन्ही मुलांना उत्तम संस्कार दिले असून ते खूप चांगले आहेत. विकी – सनी हे दोघंही अतिशय डाऊन टू अर्थ असून त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे. याचं श्रेय त्यांच्या आई-बाबांना जातं.” असं कतरिनाने सांगितलं.