Katrina Kaif Shared Long Hair Secret : कतरिना कैफ बॉलीवुडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मुलगा विहानच्या जन्मानंतर ती त्याच्या संगोपनात व्यग्र असून सध्या लाईनलाईटपासून दूर आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते आणि त्यामार्फत तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करत असते. कतरिनाने काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर केलेली ज्यामधील तिच्या फोटोंनी अनेकांचं लक्ष वेधलं. यामागचं कारण होतं तिचे लांब सडक केस. तिचे काळ्या आणि दाट केस अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर अनेकांना अभिनेत्रीच्या लांब सडक केसांमागचं रहस्य काय आहे याबद्दलची उत्सुकता निर्माण झाली.
कतरिना अभिनय क्षेत्रात काम करण्याबरोबर स्वतःचा ब्युटी ब्रँडसुद्धा चालवते. त्यामुळे अभिनेत्री असण्याबरोबर ती एक यशस्वी उद्योजिकासुद्धा आहे. याच ब्रँडच्या प्रमोशननिमित्त काही दिवसांपूर्वी तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिच्या लांब सडक केसां मागचंरहस्य सांगितलं होतं. अभिनेत्री तिच्या केसांसाठी काय करते, कोणतं तेल वापरते? याबद्दलची माहिती तिने त्यामधून दिलेली अभिनेत्री नेमकं काय म्हणाली याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
कतरिनासाठी सासूबाई बनवतात घरगुती तेल
कतरिनाने ‘द वीक’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या केसांमागचं रहस्य सांगितलं होतं. खरंतर कतरिना तिच्या केसांसाठी कोणताही माहागडा शँपू किंवा तेल वापरत नाही तर ती घरगुती उपाय करते. महत्त्वाचं म्हणजे ती तिच्या सासूबाईंनी बनवलेल्या तेलाचा वापर करते. तिने हे तेल कशापासून बनलेलं आहे याचीही माहिती दिली आहे.
कतरिनाने सांगितलं लांब सडक केसांमागचं रहस्य
कतरिना मुलाखतीत म्हणालेली, “मी माझ्या सासूबाईंना मला माझ्या केसांची काळजी घेण्याची गरज वाटतेय ते कमजोर झाले आहेत असं सांगत होते. तेव्हा त्या म्हणाल्या एक तेल आहे जे मी घरी बनवायचे आणि वापरायचे. तेव्हा मी त्यांना माझ्यासाठीसुद्धा ते तेल बनवण्याची विनंती केली आणि त्यांनी माझ्यासाठी ते बनवलं. ते खूप अप्रतिम तेल आहे मी सध्या तेच वापरत आहे.”
कतरिनाला पुढे तिच्या सासूबाई कशापासून ते तेल बनवतात असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “त्यामध्ये कांदा, आवळा, आव्हाकॉडो आणि इतर काही दोन तीन गोष्टी होत्या. या सर्व गोष्टी खूप फायदेशीर आहेत.” कतरिनाने पुढे केसांसाठी नारळाचं तेलही चांगलं असतं असं म्हटलं आहे.
