Katrina Kaif shares Photos: कतरिना कैफ व तिचा पती अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वी मोठ्या चर्चेत आले होते. मुंबई विमानतळावर ते त्यांच्या मुलासह पोहोचले होते. यावेळी तेथील पापाराझींनी त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. कतरिना व विकीने त्यांच्या मुलाचा चेहरा पापाराझींना दाखवला, मात्र त्याचे फोटो काढू नयेत, अशी विनंती पापाराझींना केली. पापाराझींनादेखील पहिल्यांदाचा विहानचा चेहरा पाहायला मिळाला. आता कतरिना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती नेमकी कशामुळे चर्चेत आली आहे, याबद्दल जाणून घेऊ…
कतरिना कैफने शेअर केलेले फोटो चर्चेत
कतरिना सध्या चित्रपटांत सक्रिय नाही. असे असले तरी ती विकीच्या चित्रपटांच्या स्क्रीनिंगला हजेरी लावताना दिसते. याबरोबरच, ती सोशल मीडियावरही सक्रिय असते. नुकतेच तिने मे महिन्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मे महिन्यात विकीचा वाढदिवस होता. त्याचे सेलिब्रेशन, त्याच्या वाढदिवसासाठी बनवलेला खास केक, ज्यावर आई-वडील-मुलगा यांचे कार्टुन स्वरुपातील चित्र आहे. तसेच,त्यावर आमचे तुझ्यावर प्रेम आहे, असेही लिहिले आहे. याबरोबरच, कतरिनाचे विविध स्टाईलमधील फोटो लक्ष वेधून घेत आहेत. एका फोटोमध्ये हॉट चॉकलेट, कॉफी दिसत आहे. याबरोबरच विकी व कतरिनाचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, फोटोंमधील त्यांच्या मुलाची खेळणीही लक्ष वेधून घेत आहेत. एक फोटो गजपती कुलपती या लहान मुलांच्या पुस्तकाचा दिसत आहे.
कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे केस सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहेत. तिचे निरोगी, चमकदार आणि लांब केस सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत याबद्दल लिहिले आहे. नेटकऱ्यांनी अनेक कमेंट करत कतरिनाचे कौतुक केले आहे.
नेटकरी काय म्हणाले?
एकाने लिहिले, “खूप सुंदर”, दुसऱ्या एकाने लिहिले, “विकीबरोबर राहून तूही पंजाबी झाली आहेस”, आणखी एकाने लिहिले, “प्लीज तुझं हेअर केअर रुटिन सांग”, एकाने लिहिले, “तिचे केस खूप सुंदर आहेत”, एकाने लिहिले, “तुझे केस”, आणखी एकाने लिहिले, “वाह!लांबसडक केस”, एकाने लिहिले, “तुझे केस चमकदार दिसत आहेत. तू त्यांची कशी काळजी घेतेस”, एकाने लिहिले, “केस खूप छान आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. ज्या फक्त कतरिनाच्या केसांबद्दल आहेत. अनेकांनी तिच्या केसांचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी ती तिच्या केसांची कशी काळजी घेते, याबद्दल विचारले आहे.




दरम्यान, कतरीना आता स्क्रीनवर कधी परतणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
