Katrina Kaif and Akshay Kumar Romance: बॉलीवूडची ‘बार्बी डॉल’ कतरिना कैफ आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांनी आजवर ८ सुपरहीट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पडद्यावर जरी या दोघांनी रोमँटिक केमिस्ट्री गाजवली असली, तरी खऱ्या आयुष्यात त्यांच्यात एक अतूट मैत्रीचे नाते आहे. कतरिनाने एकदा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये एक धक्कादायक पण मजेशीर खुलासा केला होता. जेव्हा ती तिच्या करिअरमधील सर्वात हिट गाणं ‘शीला की जवानी’ शूट करत होती, तेव्हा तिला अक्षय कुमारला राखी बांधायची होती. अक्षयचा प्रोटेक्टिव्ह स्वभाव आणि त्याने घेतलेली काळजी पाहून कतरिना इतकी प्रभावित झाली की तिला तो आपला भाऊ वाटू लागला होता.

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांत एकत्र काम केलंय. पडद्यावरची या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. पण एकदा कतरिना कैफला अक्षय कुमारला राखी बांधायची इच्छा होती, हे तुम्हाला माहित आहे का? होय. हे खरं आहे. कारण कतरिना कैफ स्वतः याबद्दल बोलली होती. कतरिना कैफने जवळपास ८ चित्रपटांमध्ये अक्षय कुमारबरोबर रोमान्स केला. मात्र, कतरिनाने स्वतः एकदा अक्षयला राखी बांधण्याबद्दल भाष्य केलं होतं.

कपिल शर्माने कतरिना कैफला विचारलेला प्रश्न

अक्षय आणि कतरिना पडद्यावर जरी रोमान्स केला असला, तरी त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. कतरिनाला अक्षयचा काळजी घेणारा स्वभाव खूप आवडायचा आणि ती त्याच्या या स्वभावावर खूप प्रभावित झाली होती. या गोष्टीचा खुलासा खुद्द कतरिनाने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता. तेव्हा कपिलने तिला विचारलं होतं की, “अक्षय कुमारने तुझ्यासोबत इतक्या चित्रपटांत रोमान्स केला आहे, मग तुला त्याला राखी का बांधायची होती?”

कतरिना कैफने अक्षय कुमारला राखी बांधण्याबद्दल काय म्हटलं होतं?

या प्रश्नाचे उत्तर देताना कतरिना कैफने तिच्या हिट गाण्याच्या शूटिंगचा किस्सा सांगितला होता. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा कतरिना ‘शीला की जवानी’ गाण्याचे शूटिंग करत होती. त्यावेळी अक्षयने तिची खूप काळजी घेतली होती. अक्षय आपली इतकी काळजी घेतो, याचं कतरिनाला खूप कौतुक वाटलं होतं. “मला असं वाटलं की जो आपली काळजी घेतो, रक्षण करतो त्याला लोक राखी बांधतात, म्हणून मी विचार केला की मी सुद्धा अक्षय कुमारला राखी बांधते,” असं कतरिना कैफने म्हटलं होतं. हे बोलताना ती स्वतःही खूप हसली आणि तिचं हे बोलणे ऐकून कपिल शर्मालाही हसू आवरलं नव्हतं.

कोल्हापूरच्या क्लासमध्ये ओळख ते २७ वर्षांचा सुखी संसार; आर. माधवन आणि मराठमोळ्या सरिता बिर्जेची फिल्मी लव्ह स्टोरीकतरिना कैफचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. कतरिनाने ४ वर्षांपूर्वी अभिनेता विकी कौशलशी लग्न केलं. आता कतरिना कैफने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. कतरिना काही महिन्यांपूर्वी आई झाली. ती तिचा मुलगा विहान कौशलबरोबर वेळ घालवत आहे आणि मातृत्वाचा अनुभव घेत आहे.