scorecardresearch

Premium

Video: “बाबा रोज रात्री म्हणतात, चला फिल्म बघूया अन्…”, अभिषेक बच्चनने बिग बींची मिमिक्री करत सांगितला ‘तो’ किस्सा

चित्रपट पाहायचं ठरल्यावर अमिताभ बच्चन काय करतात? अभिषेकने मिमिक्री करत केला खुलासा, पाहा व्हिडीओ

abhishek bachchan mimics dad amitabh bachchan
अभिषेक बच्चन व अमिताभ बच्चन

अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या ‘घूमर’ चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. त्यानिमित्ताने तो रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावत आहे. नुकताच तो ‘कौन बनेगा करोडपती’च्या १५ व्या पर्वामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला. या शोचे होस्ट अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन पुन्हा एकदा मंचावर एकत्र दिसले. यावेळी अभिषेकने त्याचे मेगास्टार वडील अमिताभ यांच्याबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला.

‘गदर २’ समोर टिकला नाही ‘घूमर’, अभिषेक बच्चनच्या चित्रपटाची निराशाजनक कामगिरी; पहिल्या दिवशी कमावले फक्त…

adah-sharma
‘द व्हॅक्सिन वॉर’वर प्रतिक्रिया देण्यास अदा शर्माने दिला नकार; अभिनेत्रीने सांगितलं यामागील कारण
Esha Gupta faced casting couch twice
“मी नकार दिल्यावर सहनिर्मात्याने…”, इशा गुप्ताने सांगितले कास्टिंग काउचचे धक्कादायक अनुभव; म्हणाली, “दोघे जण…”
Raima Sen trolled for doing the vaccine war
“मला लोकांनी अनफॉलो केलं,” रायमाने सांगितला ‘व्हॅक्सिन वॉर’मध्ये काम केल्यानंतरचा अनुभव; म्हणाली, “मी फक्त एक…”
/actress-prarthana-behere
“तीन वर्ष मी…”; प्रार्थना बेहरेने सांगितलं लग्नानंतर चित्रपटात न दिसण्यामागचं कारण

सोनी एंटरटेनमेंट चॅनलच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केली आहे. यामध्ये रात्री कुटुंबाने एकत्र बसून चित्रपट पाहायचं ठरल्यावर अमिताभ बच्चन काय करतात, याचा खुलासा केला. “एकत्र बसून चित्रपट पाहणं ही आमच्या कुटुंबाची आवडती गोष्ट आहे. “बाबा रोज रात्री म्हणतात, ‘चला फिल्म बघूया, एखादी चांगली अॅक्शन फिल्म लावा.’ चित्रपट सुरू झाल्यावर तुम्ही इंटरव्हलमध्ये पाहाल तर ते झोपलेले असतात,” असं अभिषेक सांगतो. त्यानंतर तो झोपण्याची अॅक्टिंग करतो. आणि चित्रपट पाहताना त्याचे वडील बिग बी झोपून जातात असं तो सांगतो. अभिषेकने हा किस्सा सांगताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकतो.

दरम्यान, ‘घूमर’ एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला चित्रपट आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट फक्त ८५ लाख रुपयांचा गल्ला जमवू शकला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kbc 15 abhishek bachchan mimics amitabh bachchan reveals big b sleeps in middle of movie night hrc

First published on: 19-08-2023 at 11:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×