Kesari Chapter 2 Box Office Collection Day 3 : जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट शुक्रवारी (१८ एप्रिल रोजी) प्रदर्शित झाला. अक्षय कुमार, आर माधवन व अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे कमाईच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.

१९९१ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची कथा दाखवणाऱ्या ‘केसरी चॅप्टर 2’ ने पहिल्याच दिवशी ७.८४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सिनेमाच्या कमाईत वाढ झाली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने १०.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. आता तिसऱ्या दिवसाचे म्हणजेच रविवारचे कलेक्शन समोर आले आहे. दोन्ही दिवसांच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी रविवारच्या वीकेंडचा फायदा चित्रपटाला झाला.

‘केसरी चॅप्टर २’ ची एकूण कमाई किती?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने रविवारी १२.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाची एकूण कमाई सातत्याने वाढत आहे. सुरुवात संथ झाली असली तरी त्याची कमाई हळूहळू वाढली आहे. आता पहिल्या वीकेंडची सिनेमाची एकूण कमाई ३०.८९ कोटी रुपये झाली आहे. मात्र, तिसऱ्या दिवसाची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. अधिकृत कमाईचे आकडे समोर आल्यानंतर हा आकडा बदलू शकतो.

तीन दिवस फार चांगली नाही पण समाधानकारक कमाई करणारा ‘केसरी २’ सोमवारी आधीच्या तीन दिवसाइतकी कमाई करू शकणार नाही. वीक डेजमध्ये कोणत्याही चित्रपटाच्या कमाईचे आकडे घसरतात. खरं तर मागील काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सर्वच चित्रपट फ्लॉप झाले आहे. त्यामुळे ‘केसरी २’ च्या कलेक्शनकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तब्बल २८० कोटींचं बजेट (Kesari 2 Budget) असलेल्या ‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटाला निर्मिती खर्च वसूल करण्यासाठी दमदार कमाई करावी लागेल. चित्रपटाने आतापर्यंत फक्त ३० कोटी कमावले आहेत. चित्रपटाने वीकेंडमध्ये इतकी कमी कमाई केली असताना, वीक डेजमध्ये चित्रपट चांगला व्यवसाय करू शकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट सोमवारी किती कमाई करतो ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.