Khushi Kapoor Dating Aakash Mehta: श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. याआधी ती ‘द आर्चीज’ मधील तिचा सहकलाकार वेदांग रैना याला डेट करत असल्याच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. दोघेही जवळपास दोन वर्षे एकत्र होते आणि त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. आता खुशीच्या लव्ह लाइफबद्दल नवीन अपडेट आली आहे. खुशी पुन्हा प्रेमात पडल्याचं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे ती तिचा बालपणीचा मित्र आणि एक्स बॉयफ्रेंडला पुन्हा डेट करतेय, अशी चर्चा होत आहे.
खुशी कपूर एक्स बॉयफ्रेंड आकाश मेहताबरोबर नात्यात असल्याचं समोर आलंय. ‘बॉम्बे टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, खुशी कपूर आणि वेदांग रैना यांचं या वर्षाच्या ब्रेकअप झालं. पण ते जवळपास दोन वर्षे नात्यात होते. वेदांगबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर खुशीला खूप त्रास झाला आणि यातून बाहेर पडण्यासाठी तिला काही काळ लागला, असं म्हटलं जातंय.
खुशी कपूर आकाश मेहताचा करतेय डेट
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “वेदांगबरोबर झालेल्या ब्रेकअपचा खुशीवर खूप परिणाम झाला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचं ब्रेकअप झालं. खुशीला ब्रेकअपचा त्रास झाला. मात्र, आता ती यातून सावरली आहे. आता ती आकाशबरोबर आनंदी आहे. आता तिला दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याला डेट करायचं नाही.”
खुशीचे अनेक जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यही इन्स्टाग्रामवर आकाशला फॉलो करतात. यामध्ये जान्हवी कपूर, अनन्या पांडे, ओरी, अर्जुन कपूर, अंशूला कपूर, शिखर पहारिया, नव्या नवेली नंदा आणि शनाया कपूर यांचा समावेश आहे.

डेटिंगबद्दल खुशी कपूरने व्यक्त केलेलं मत
खुशीने एका जुन्या मुलाखतीत डेटिंगबद्दल भाष्य केलं होतं. “आजकाल डेट करणं थोडं क्लिष्ट झालंय, कारण लोकांनी यात अनेक नवीन टर्म्स आणल्या आहेत, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अस्पष्ट असतात. मला वाटतं की लोक आता एकमेकांना स्पष्ट प्रश्न विचारत नाहीत आणि मर्यादा ठरवून घेत नाहीत. मी खूप सरळ स्वभावाची आहे. मला फिरवून-फिरवून बोलायला आवडत नाही. जर मला कोणी आवडलं, तर मी मनापासून त्या नात्यात असते. पण मी लाजाळूसुद्धा आहे. मी स्वतःहून किती पुढाकार घेईन माहीत नाही. मात्र, समोरच्याला समजेल इतके पुरेसे इशारे मी नक्कीच करेन,” असं खुशी कपूर म्हणाली होती.
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, खुशी लवकरच तिची आई श्रीदेवी यांच्या ‘मॉम’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. यामध्ये करिश्मा तन्ना देखील मुख्य भूमिकेत आहे.
