Khushi Kapoor Vedang Raina Breakup : बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटी व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा होत असते. कोण कोणाला डेट करतंय, याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. बॉलीवूडचं लाडकं जोडपं तारा सुतारिया व वीर पहारिया यांचं ब्रेकअप झालंय, अशा चर्चा होत आहेत. याचदरम्यान आणखी एक सेलिब्रिटी कपल वेगळं झाल्याची बातमी समोर आली आहे. बोनी कपूर यांची धाकटी लेक, जान्हवी कपूरची धाकटी बहीण, अभिनेत्री खुशी कपूर व अभिनेता वेदांग रैनाचं ब्रेकअप झालंय, असं म्हटलं जात आहे.

वेदांग व खुशी यांनी आपल्या नात्याची जाहिरपणे कबुली दिली नव्हती. पण दोघेही एकत्र व्हेकेशनला गेले होते, तसेच अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात ते एकत्र आले होते. दोघे दोन वर्षे एकत्र होते, पण काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की खुशी कपूर आणि वेदांग रैना आता एकत्र नाहीत. मात्र या नात्याबद्दल किंवा ब्रेकअपबद्दल खुशी व वेदांग दोघांपैकी कोणीही अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

खुशी कपूर व वेदांग रैना यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून केली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते डेट करू लागले. वेदांग व खुशी एकत्र फिरायला जायचे, डेटवर जायचे. कपूर कुटुंबाच्या अनेक कार्यक्रमांना वेदांग हजेरी लावायचा. पण खुशी व वेदांगने कधीच जाहिरपणे प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण एका पत्रकाराने अलिकडेच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या आणखी उधाण आलं आहे.

Award Banner
khushi kapoor vedang raina
खुशी कपूर व वेदांग रैना (फोटो- इन्स्टाग्राम)

खुशी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने नेटफ्लिक्सवरील ‘द आर्चीज’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने आमिर खानचा मुलगा जुनैद खानबरोबर ‘लव्हयापा’ हा चित्रपट केला. तसेच तिने सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानबरोबर नादानियां सिनमात काम केलं होतं. नादािनयां नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. खुशी कपूर लवकरच तिची आई श्रीदेवीचा सुपरहिट चित्रपट मॉमचा सिक्वेल ‘मॉम २’ मध्ये झळकणार आहे. तिच्या या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

दुसरीकडे वेदांग रैनाने ‘द आर्चीज’नंतर आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती. जिगरा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, पण या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.