अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वीच लग्न केलं. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती. त्यानंतर दोघंही बरेचदा एकत्र स्पॉट झाले आणि या जोडीला चाहत्याची चांगलीच पसंती मिळाली. पण नुकत्याच झालेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये मात्र या दोघांनी एकत्र हजेरी लावली नाही. दोघंही वेगवेगळे या पुरस्कार सोहळ्याला पोहोचले. याशिवाय या पुरस्कार सोहळ्यातील एका व्हिडीओमुळे आता कियार अडवाणीला ट्रोल केलं जात आहे.

लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ-कियाराने एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यामुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. यावेळी कियाराने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. लग्नानंतर सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावण्याची सिद्धार्थ-कियाराची ही पहिलीच वेळ होती. मात्र या ठिकाणी दोघंही वेगवेगळे पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. तसेच कियारा अडवाणीला ट्रोलही केलं गेलं.

four children die in gujarat from suspected chandipura virus
संशयित चंदिपुरा विषाणूने चार मुलांचा मृत्यू; जरातमध्ये दोघांवर उपचार सुरू,रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्यात
Goregaon-Mulund Link Road, pm modi,
गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प : पंतप्रधानांच्या हस्ते जुळ्या बोगद्याचे उद्या भूमिपूजन
Rahul Gandhi Comments On Udaipur Tailor Killing Incident
“ती लहान मुलं..”, म्हणत राहुल गांधींचे कन्हैय्या लालची भरदिवसा हत्या करणाऱ्यांना समर्थन? खऱ्या Video तील वाक्य ऐका
European tracking device, vultures,
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १० पांढऱ्या गिधाडांना युरोपातील ट्रॅकिंग डिव्हाईस!
nagpur residents protest against smart prepaid meter
नागपुरात स्मार्ट प्रीपेड मीटर’विरोधातील आंदोलनाची धार आणखी तीव्र होणार
kolhapur annalal surana
वाढत्या अपप्रवृत्ती, हिंसाचाराविरोधात आवाज उठवा; अन्नालाल सुराणा यांचे आवाहन, शाहू पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान
Supriya SUle
“माझ्या वाढदिवसाला फ्लेक्स लावू नका, त्याऐवजी…”, सुप्रिया सुळेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
Dead Rat Found In Sambar in Gujrat Hotel
सांबारमध्ये आढळला मृत उंदीर, गुजरातमधल्या प्रसिद्ध देवी डोसा सेंटरमधला धक्कादायक प्रकार

आणखी वाचा- “हिला तर नुसती फॅशन…”, एअरपोर्टवरील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी

कियारा अडवाणीचा या पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिने मंगळसूत्र, वेडिंग रिंग घातलेली नाही. तसेच सिंदूरही लावलेला नाही. त्यावरुन येणाऱ्या काळात लग्नाचं काय महत्त्व राहणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना, “ना मंगळसूत्र ना सिंदूर ना वेडिंग रिंग, हे लग्न आहे की ड्रामा?” असा सवाल केला आहे. तर काही युजर्सनी, “फॅशनच्या नादात लग्न झालंय हे विसरून गेले आहेत” असा टोलाही लगावला आहे.

आणखी वाचा- “माझ्यावेळीही त्यांनी…”, सिद्धार्थ शुक्लाच्या विजेतेपदाबद्दल ३ वर्षांनंतर आसिम रियाजचा खळबळजनक खुलासा

दरम्यान सिद्धार्थ आणि कियाराने ७ फेब्रुवारीला जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. या लग्नाला दोघांचेही कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. तसेच काही निवडक बॉलिवूड सेलिब्रेटींनी निमंत्रत करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे आणि त्याआधीच्या विधींचे बरेच फोटो व्हायरल झाले होते.