सिद्धार्थ-कियाराचा मेहंदी सोहळा संपन्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य | Kiara advani old mehandi photo got viral on social media | Loksatta

सिद्धार्थ-कियाराचा मेहंदी सोहळा संपन्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

६ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ-कियारा विवाहबंधनात अडकणार आहेत.

kiara mehandi

गेली अनेक दिवस सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अखेर ही दोघं परवा म्हणजेच ६ फेब्रुवारी रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. आता कियाराचा हाताला मेहंदी लावतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण हा फोटो त्यांच्या लग्नसमारंभातला आहे की शूटिंगदरम्यानचा हे आपण आता जाणून घेऊया.

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसवर पार पडणार आहे. या लग्न सोहळ्यासाठी अडवाणी आणि मल्होत्रा कुटुंबीय नुकतेच जैसलमेरला रवाना झाले. ५ फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. आता अशातच कियाराच्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.

आणखी वाचा : याला म्हणतात स्वॅग! आलिशान गाडीने नाही तर थेट हेलिकॉप्टरमधून शूटिंगला येतो ‘हा’ भारतीय अभिनेता

कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड आतुर झाले आहेत. यांच्या लग्नाची मेहंदी, संगीत, हळद कधी रंगतेय याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. आता अशातच सोशल मीडियावर कियाराचा हाताला मेहंदी लावतानाचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती गुलाबी रंगाचा भरजरी घागरा घालून हातावर मेहंदी काढून घेताना दिसतेय. हा फोटो पाहून सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्न सोहळ्याच्या मेहंदी समारंभातील हा फोटो आहे असं अनेकांना वाटलं. परंतु या फोटो मागील सत्य वेगळा आहे. काही महिन्यांपूर्वी कियाराने एक जाहिरात केली होती. त्या जाहिरातीत तिचं लग्न दाखवण्यात आलं होतं. त्यादरम्यानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “सिनेसृष्टीत क्वचितच…” सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतची खास पोस्ट

दरम्यान लवकरच सिद्धार्थ आणखी कियाराच्या लग्नाचा मेहंदी सोहळा रंगणार आहे. सेलिब्रिटी कलाकार वीना नागदा कियारा अडवाणीच्या हातावर मेहंदी लावणार आहे. वीणा यांनी सोशल मीडियावर अनेक स्टोरी शेअर करत सांगितलं की त्या राजस्थानला रवाना होत आहेत. सिद्धार्थ आणि कियारा चा लग्न सोहळा शाही थाटात रंगणार आहे. या लग्नासाठी १०० ते १२५ लोकांना निमंत्रण दिलं गेलं आहे. या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराबरोबरच बॉलिवूडमधील दिग्गज स्टार्स नाही आमंत्रित केलं गेलं आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, वरुण धवन यांबरोबरच अनेक आघाडीचे कलाकार यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 17:14 IST
Next Story
विवाहित व्यक्तीबरोबर अरुणा इराणींनी केलं लग्न, बऱ्याच वर्षांनंतर केला मोठा खुलासा, म्हणाल्या, “लग्न झालेल्या पुरुषाबरोबर…”