scorecardresearch

Premium

कियारा अडवाणीने सिद्धार्थच्या आईला असं केलं इम्प्रेस; किस्सा सांगत म्हणाली, “सासूबाईंना असा मस्का लावला…”

कियारा अडवाणीने सासूबाईंना केलं इम्प्रेस; घरात बनवला खास पदार्थ

Kiara Advani impress Sidharth Malhotra mother
कियारा अडवाणीने सिद्धार्थच्या आईला केलं इम्प्रेस

अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कार्तिक-कियाराचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने गेल्या काही दिवसांत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. चित्रपटाचे प्रमोशन करताना कियारा अनेकदा तिचा नवरा सिद्धार्थ मल्होत्रा आणि तिच्या सासूचे कौतुक करताना दिसली.

हेही वाचा : सुप्रसिद्ध बॉलीवूड निर्माती दिव्या खोसला कुमारच्या आईचे निधन; भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “तुझ्यापोटी माझा जन्म…”

Avdhoot
‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पृहा जोशीच्या ऐवजी दिसणार रसिका सुनील, प्रतिक्रिया देत निर्माता अवधूत गुप्ते म्हणाला, “मी तिला…”
Boyfriend Gets Girlfriends Hickey Mark Tattooed In Viral Video
हद्दच झाली राव! प्रेयसी हातावर चावल्याच्या आठवणीत प्रियकराने काढला टॅटू, VIDEO पाहून संतापले नेटकरी म्हणाले…
Janhvi Kapoor Recalls Seeing Her Morphed Photos Online
“माझे फोटो पॉर्नोग्राफिक साइटवर…”, जान्हवी कपूरने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “माझे मित्र-मैत्रिणी…”
National Crush Sai Pallavi Got Married In Simple Look Fans Say She Proved Love Has No Color But Reality Is Something else
नॅशनल क्रश साई पल्लवीने बांधली लग्नगाठ? फोटो पाहून चाहते म्हणतात, “तिने सिद्ध केलं प्रेमाला..” नीट वाचा पोस्ट

‘मिर्ची प्लस’ला दिलेल्या मुलाखतीतकियारा अडवाणीने तिची सासू रिमा मल्होत्रा यांना पाणीपुरी आवडत असल्याचा उल्लेख केला आहे. अभिनेत्रीला “तुला पाणीपुरी खूप जास्त ओव्हररेटेड वाटते का? असा प्रश्न विचारण्यात आला.” यावर कियारा म्हणाली, “मुंबई, दिल्ली, कोलकाता येथे मिळणारे पाणीपुरीचे सगळे प्रकार मला खूप जास्त आवडतात.”

हेही वाचा : “रिजेक्शन, नकार यामुळे जीवनात…” आयुष्यमान खुरानाने केला संघर्षाच्या दिवसांबद्दल खुलासा

पाणीपुरीबाबत खास आठवण सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या सासूबाई सध्या मुंबईत आमच्याकडे राहायला आल्या आहेत. पहिल्याच दिवशी मी त्यांना पाणीपुरी बनवून इम्प्रेस केले .” पुढे तिला “तुमच्या लग्नात पाणीपुरीचा स्टॉल होता का?” असा प्रश्न विचारण्यात आला यावर कियारा म्हणाली, “हो…कारण माझ्या सासूबाईंना पाणीपुरी प्रचंड आवडते. आताच त्या दिल्लीहून मुंबईत आल्या आहेत. मला पहिल्या दिवसापासून माहित होते की, त्यांना पाणीपुरी किती आवडते. मी त्यांना म्हणाले, आज आपण घरी पाणीपुरी बनवूया, त्यांना असा मस्का लावला की… (जो मस्का लगाया) मला माहिती होतं हे ऐकल्यावर त्या खूप आनंदी होणार”

हेही वाचा : “माय हॉटी…” रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

दरम्यान, अभिनेत्री कियारा अडवाणीने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राबरोबर ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. जैसलमेरला सूर्यगड पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या प्रीमियरला सिद्धार्थ-कियाराने जोडीने हजेरी लावली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kiara advani says she tried to impress sidharth malhotra mother by making panipuri at home sva 00

First published on: 06-07-2023 at 19:21 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×