Sidharth Malhotra and Kiara Advani announces Second Pregnancy : बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी व अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्रीने खास पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज सर्वांना दिली आहे. सिड-कियारा लवकरच त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार आहेत.

कियारा अडवाणी पोस्ट शेअर करत लिहिते, “पुन्हा एकदा आमच्या आयुष्यात खास क्षण आलाय, तुमचे आशीर्वाद असेच कायम राहूद्यात. आमचं मन आज प्रेम अन् कृतज्ञतेने भरून गेलंय.”

कियाराने शेअर केलेल्या फोटोमध्ये लहान बाळाचे मोजे अन् त्यावर तिच्या लेकीने म्हणजेच सरायाहने हात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे. सरायाहचा जन्म १५ जुलै २०२५ रोजी झाला होता. लेकीच्या जन्मानंतर वर्षभरातच कियारा पुन्हा एकदा आई होणार आहे. अभिनेत्रीने ही गुडन्यूज शेअर करताच चाहत्यांसह बॉलीवूड कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. करण जोहर, भूमी पेडणेकर, करीना कपूर, अथिया शेट्टी, पत्रलेखा या सगळ्याच कलाकारांनी कियाराला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थ-कियाराबद्दल सांगायचं झालं, तर या दोघांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर दोघांनी ‘शेरशाह’ सिनेमात एकत्र काम केलं. याच चित्रपटाच्या सेटवर सिड-कियाराच्या लव्हस्टोरीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी या जोडप्याने राजस्थानमधील जैसलमेर येते थाटामाटात लग्न केलं होतं. सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही लग्नसोहळा पार पडला होता.

सिद्धार्थ व कियाराने लग्नानंतर अडीच वर्षांनी पहिल्या बाळाचं स्वागत केलं. कियारा अडवाणीने १५ जुलै २०२५ गोंडस मुलीला ( सरायाह ) जन्म दिला. आता लवकरच त्यांच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन होणार आहे. सध्या संपूर्ण कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.