अफेअर, लिव्ह इन, १५ वर्षांचा संसार...'असं' होतं किरण रावचं आमिर खानबरोबर नातं | Kiran rao and aamir khan share special bond even after their divorce | Loksatta

अफेअर, लिव्ह इन, १५ वर्षांचा संसार…’असं’ होतं किरण रावचं आमिर खानबरोबर नातं

प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माती किरण राव हिचा आज ४९ वा वाढदिवस.

अफेअर, लिव्ह इन, १५ वर्षांचा संसार…’असं’ होतं किरण रावचं आमिर खानबरोबर नातं

प्रसिद्ध दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माती किरण राव हिचा आज ४९ वा वाढदिवस. किरण रावने ‘लगान’ चित्रपटातून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘दिल्ली बेली’, ‘धोबी घाट’ आणि ‘पीपली लाइव्ह’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र, ती तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आली. विशेषकरून आमिर खान आणि तिचं नातं हे नेहमीच चर्चेचा विषय बनलं.

आणखी वाचा : वरुण धवनने व्यक्त केली दक्षिणात्य चित्रपटांत काम करण्याची इच्छा; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये आता…”

‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर किरण राव आणि आमिरची लव्ह स्टोरी सुरु झाली. ‘लगान’च्या सेटवर ती पहिल्यांदा आमिर खानला भेटली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान किरणला आमिरला सेटवर घेऊन यायची जबाबदारी देण्यात आली होती. याचमुळे दोघांमधील नातं अधिक चांगलं झालं. अल्पावधीतच दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. एकदा किरणने तिच्या मुलाखतीत सांगितलं होतं की, आमिर ज्या पद्धतीने सेटवर सगळ्यांना भेटायचा आणि त्यांच्यासोबत विनोद करायचा, तिला आमिरमध्ये एक सामान्य माणूस दिसला जो तिला आवडला.

आमिर खानने २००२ मध्ये त्याची पहिली पत्नी रीनाला घटस्फोट दिला. आमिरसाठी तो काळ खूप कठीण होता आणि जेव्हा आमिर आणि त्यावेळी त्याला खूप एकटं वाटायचं. यादरम्यान किरण राव आणि आमिर खान यांचं नातं अधिक घट्ट झालं असं बोललं जातं. एके दिवशी ते दोघे जवळपास अर्धा तास फोनवर बोलले, त्यानंतर दोघांना एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली. त्यानंतर हे दोघं एकमेकांना डेट करू लागले. या दरम्यान काही काळ आमिर खान आणि किरण राव लिव्ह-इनमध्येही होते.

हेही वाचा : Koffee with Karan 7 : घटस्फोटानंतरही आमिरचं किरण रावशी आहे खास नातं, म्हणाला “ती नेहमीच माझ्या…”

आमिर खान आणि किरण राव यांनी २००५ मध्ये लग्न केलं. ही दोघंही त्यांच्या नात्यामुळे खूप खूश होते. लग्नानंतर काही वर्षांनी किरणला सरोगसीच्या मदतीने मुलगा झाला. त्याचं नाव त्यांनी आझाद ठेवलं. पण त्यानंतर अचानक लग्नाच्या १५ वर्षानंतर किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. आजपासून ते फक्त मित्र आहेत आणि पती-पत्नी म्हणून एकत्र राहणार नाहीत, असं त्या दोघांनी एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं. किरण आणि आमिरच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. पण आजही अनेक कार्यक्रमांमध्ये आमिर खान आणि किरण राव एकत्र दिसतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-11-2022 at 12:13 IST
Next Story
वरुण धवनने व्यक्त केली दक्षिणात्य चित्रपटांत काम करण्याची इच्छा; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये आता…”