फिल्ममेकर आणि दिग्दर्शिका किरण रावने लस्ट स्टोरीज ३ च्या प्रमोशनमध्ये बोलत असताना युवा पिढीबाबत काय वाटतं ते विचार स्पष्ट केले आहेत. आजच्या काळात प्रेमाच्या नात्यांमध्ये लग्नाआधी येणाऱ्या शरीर संबंधांबाबही किरण रावने भाष्य केलं आहे. लस्ट स्टोरीज ३ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यामध्ये चार दिग्दर्शकांच्या चार स्टोरीज आहेत. ज्यातली एक किरण रावने दिग्दर्शित केली आहे.

किरण रावने नेमकं काय म्हटलं आहे?

किरणला प्रश्न विचारण्यात आला की तू युवकांचं प्रतिनिधित्व करणारी दिग्दर्शिका आहेस. प्रेमाबाबत आजकालची तरूण पिढी थोडी फ्रिवोलस म्हणजे कधी गंभीर तर कधी फारशी हलकी फुलकी विचार करणारी असते. तुला याबाबत काय वाटतं? यावर किरण म्हणाली फ्रिवोलस या शब्दापेक्षा मला वाटतं की आज कालची मुलं ही फ्री आहेत. मला त्यांच्याबाबत हाच शब्द वापरणं पसंत पडेल. एक काळ असाही होता की दोन व्यक्तींमध्ये एक स्त्री आणि पुरुष यांच्यात एक खास नातं असलं पाहिजे अशी अपेक्षा असायची. आता ती अपेक्षा नाही. माझ्या पिढीच्या तुलनेत आत्ताची पिढी जास्त स्वतंत्र विचारांची आहे. सध्याचा काळ बदलला आहे आणि व्यक्त होण्याची पद्धतही बदलली आहे. आता स्वतःला व्यक्त करण्याचे प्रकार बदलले आहेत. दोन तरूण व्यक्ती आता कुठल्याही बंधनात अडकत नाहीत, तरीही एकमेकांकडे आकर्षित होतात. यानंतर काय होईल? याबाबत ते विचार करतातच असं नाही.

मी ज्या काळात मोठी झाले तो काळ वेगळा होता-किरण राव

किरण पुढे म्हणाली मी ज्या काळात लहानाची मोठी झाले त्या काळात अशी पद्धत होती की तुमचं नातं हे खास हवं. लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजनंतर भावनिक गुंतागुंत होती. त्यातून येणारा एक आपलेपणा होता. सध्याचा काळ बदलला आहे. आता दोन तरूण व्यक्ती लग्न न करता शरीर संबंध ठेवतात, भावनिक आणि शारीरीक पातळीवर एकत्र येतात. सध्याचं जग हे असचं आहे. आम्ही अशाच मुलांचा, पिढीचा विचार करून आमची गोष्ट तयार केली आहे. लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं यात आता काही गैर गोष्ट नाही. माझ्या काळात, अशी अपेक्षा होती की, तुमचं कोणासोबतचं नातं एका विशिष्ट प्रकारचं असेल, एकतर शारीरिक संबंध, किंवा ठरवून केलेल्या लग्नानंतरचं भावनिक नातं. पण आता तसं नाही.’

Kiran Rao and Amir Khan
किरण राव आणि आमिर खान यांचं संग्रहीत छायाचित्र

लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं हे आता नॉर्मल झालंय-किरण राव

किरण रावने असंही म्हटलंय की, ‘लोकांचे लग्नाआधीच शारीरिक संबंध असतात, हे आजकाल नॉर्मल झालंय. एकेमेकांसह भावनिक नातं असतं. आजचं जग असंच आहे. आम्ही हे जग डोळ्यासमोर ठेवून ही कथा तयार केली आणि मला वाटतं की, आम्हाला असं काहीतरी हवं होतं जे आजच्या तरुण पिढीमध्ये असलेला ताजेपणा आणि स्वातंत्र्य प्रतिबिंबित करेल.’