scorecardresearch

किरण खेर यांना करोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

किरण यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशातच आता त्यांना करोना झाला आहे.

kirron-kher
(फोटो – संग्रहित)

ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः किरण यांनी याबद्दल माहिती दिली आहे. किरण यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशातच आता त्यांना करोना झाला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत आहेत.

“कौटुंबिक दबावामुळे त्याने…” धमकीचा मेल अन् सुरक्षा वाढवल्याबद्दल सलमान खानची प्रतिक्रिया काय? मित्राने दिली माहिती

किरण खेर यांनी ट्वीट करून करोना झाल्याची माहिती दिली. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्या,” असं किरण यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट पाहून त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मल्टिपल मायलोमानंतर आता किरण खेर यांना करोना झाला आहे. आपण करोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी त्यांनीच ट्वीट करून दिली आहे. त्या कॅन्सर रुग्ण आहेत, अशातच त्यांना करोना झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, त्यांचे पती अनुपम खेर मित्र सतीश कौशिक यांच्या निधनाने दुःखी आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 11:25 IST

संबंधित बातम्या